राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:40+5:302021-07-10T04:19:40+5:30
फोटो ०९०७२०२१-आयएसएलएम- राजकीय न्यूज (सिंगल सहा फोटो) अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या ...
फोटो ०९०७२०२१-आयएसएलएम- राजकीय न्यूज (सिंगल सहा फोटो)
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुस्मिता जाधव यांना जिल्हाध्यक्षपदाची बढती मिळाल्याने या रिक्त जागेसाठी दहाहून अधिक महिला इच्छुक आहेत. ग्रामीण भागातीलच महिला आघाडीवर आहेत.
तालुकाध्यक्ष सुस्मिता जाधव जिल्हा पातळीवर गेल्या आहेत. जाधव यांनी आपल्या कारकिर्दीत तालुक्यातील वाडी-वस्त्यांवर महिलांचे संघटन करून राष्ट्रवादीची ताकत भक्कम केली आहे. त्यामुळेच त्यांना बढती देण्यात आली आहे. आता वाळवा तालुका अध्यक्षपदासाठी महिलांमध्ये रस्सीखेच सुरू असून, राष्ट्रवादी पक्षाकडे दहाहून अधिक महिलांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये कार्याध्यक्ष सुनीता देशमाने (पेठ), उपाध्यक्ष वैशाली पाटील (बहे), खजिनदार नयना पाटील (ताकारी), प्रदेश प्रतिनिधी मेघा पाटील (शिगाव), प्रदेश प्रतिनिधी कमल पाटील (इस्लामपूर), उपाध्यक्ष सायली गोंदील (वाळवा) या आघाडीवर आहेत. तर उपाध्यक्ष सुजाता पाटील (पोखर्णी), सरचिटणीस अलका माने (साखराळे) याही स्पर्धेत आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख शनिवार, १० जुलै रोजीपर्यंत आहेत; परंतु ही मुदत एक-दोन दिवस वाढविली जाण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील राष्ट्रवादीमधील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी आपआपल्या भागातील नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. काहींनी तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेच निवडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकंदरीत वाळवा तालुक्यात महिला राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील महिला आता पक्षबांधणीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापुढे निवडीचे मोठे आव्हान राहणार आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारती शेवाळे या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन निवड घोषित करण्याची शक्यता आहे.
कोट
ज्या महिला कार्यकर्त्या तालुकाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहेत; परंतु ज्या महिला पक्षासाठी पूर्ण वेळ देऊन पक्षसंघटन मजबूत करू करतील त्यांचीच या पदावर गुणवत्तेवरच निवड केली जाईल.
-सुस्मिता जाधव, जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी, सांगली.