चिकलगी भुयार मठात तुकाराम बीज उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:07+5:302021-04-02T04:26:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संख : चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले. फिजिकल डिस्टन्स, कोरोनाच्या नियमांचा पालन ...

Tukaram seed in Chikalgi Bhuyar Math | चिकलगी भुयार मठात तुकाराम बीज उत्साहात

चिकलगी भुयार मठात तुकाराम बीज उत्साहात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले. फिजिकल डिस्टन्स, कोरोनाच्या नियमांचा पालन करीत मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या उपस्थितीत तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आला. 'कोरोना हद्दपार होऊ दे' चे साकडे यावेळी पांडुरंगाला तुकारामबाबा महाराज व भाविकांनी घातले.

मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते.

कोरोनाच्या हद्दपारीसाठी पांडुरंगाला साकडे घातले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज बीज कार्यक्रम साधेपणाने साजरी केला. संकटांवर मात करण्यासाठी मनाची एकाग्रशक्ती व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन भाविकांना तुकारामबाबा महाराज यांनी केले. भाविक भजनात रंगून गेले होते. भजनानंतर दुपारी १२ वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला. दहीहंडी फोडून बिजेची सांगता झाली.

Web Title: Tukaram seed in Chikalgi Bhuyar Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.