इस्लामपुरात सोमवारी सखी सदस्यांसाठी हळदी-कुंकू समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:44+5:302021-02-13T04:25:44+5:30

इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंच हे सर्व महिलांसाठी व्यक्त होण्याचे आणि आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारे खुले व्यासपीठ आहे. ...

Turmeric-kumkum ceremony for Sakhi members in Islampur on Monday | इस्लामपुरात सोमवारी सखी सदस्यांसाठी हळदी-कुंकू समारंभ

इस्लामपुरात सोमवारी सखी सदस्यांसाठी हळदी-कुंकू समारंभ

googlenewsNext

इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंच हे सर्व महिलांसाठी व्यक्त होण्याचे आणि आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारे खुले व्यासपीठ आहे. ज्यामध्ये महिलांना दैनंदिन कामकाज आणि मनोरंजन याचा समन्वय साधून आपले जगणे आनंदी बनविता येते. अशाच आनंदाची पर्वणी सखी सदस्यांना सोमवार दि. १५ रोजी मिळणार आहे. हळदी-कुंकू, वाण वाटप आणि मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

कोरोनासारख्या जागतिक स्तरावरील संकटातून बाहेर पडत दरवर्षीप्रमाणे नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्यास ‘लोकमत’ सखी मंच सज्ज आहे. यावर्षीच्या कार्यक्रमांची सुरुवात ‘सखी संक्रांत मेळा २०२१’ या २०२१ मधील पहिल्या अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या कार्यक्रमाने करण्यात येत आहे. सखी मंच इस्लामपूर आणि एक्सेल डर्मा, स्किन, हेअर अ‍ॅन्ड लेसर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रल्हाद पाटील यांच्या हिंदी-मराठी गीतांचा कलाविष्कार सादर केला जाणार आहे. यावेळी कथाकार बाबासाहेब परीट सर्व सखींना मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी, दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एक्सेल डर्मा, स्टँड रोड, जोधपूर कॉर्नर, इस्लामपूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा सखी सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

चौकट १

या हळदी-कुंकू समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व सखींना हमखास वाण मिळणार आहे. सर्व सभासदांनी ‘लोकमत’ सखी मंचचे २०२० चे सभासद नोंदणी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच उपस्थित राहणाऱ्या सखींना भाग्यवान सोडत बक्षीस योजनेअंतर्गत पाच पैठणी आणि १ ग्रॅमचे पाच दागिने जिंकण्याची संधी मिळणार आहे. १५ फेब्रुवारीच्या ‘लोकमत’अंकात भाग्यवान सोडत योजनेचे कूपन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आपला अंक आपल्या परिसरातील पेपर विक्रेत्यांकडे संपर्क साधून चालू करा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. भाग्यवान बक्षीस सोडत योजनेसाठी प्रथमेश इलेक्ट्रॉनिक्स, इस्लामपूर आणि साई सुवर्ण ज्वेलर्स, इस्लामपूर गिफ्ट पार्टनर आहेत.

इव्हेंट पार्टनर

या कार्यक्रमासाठी एक्सेल डर्मा, स्किन, हेअर अ‍ॅन्ड लेसर क्लिनिक हे इस्लामपूरमधील अद्ययावत स्किन, हेअर अँड लेझर ट्रीटमेंट, पी. आर. पी., स्किन रिज्युनिवेशनच्या सुविधा असणारे नामवंत डॉ. प्रियांका पाटील यांचे क्लिनिक आहे. या क्लिनिकच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन सोमवार, दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे .

सखी मंच लोगो वापरणे.

Web Title: Turmeric-kumkum ceremony for Sakhi members in Islampur on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.