मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला उच्चांकी १७ हजारांवर भाव
By अशोक डोंबाळे | Published: November 15, 2023 12:18 PM2023-11-15T12:18:07+5:302023-11-15T12:18:35+5:30
गुळाला साडेचार हजार तर बेदाण्यास १६८०० रुपये दर.
अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली:सांगली मार्केट यार्डमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेल्या सौद्यात हळदी प्रति क्विंटल १७ हजार एक रुपये तर गुळाला चार हजार ५०० आणि बेदाण्यास १६ हजार ८०० रुपये दर मिळाला. हळद, गूळ, बेदाणा सौद्याचा शुभारंभ सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आले.
प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्या दिवशी पाच दुकानांमध्ये हळद सौदा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी हळदीला १७ हजार एक रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. गुळ सौद्यामध्ये चार हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चाकी दराने गुळ खरेदी केला. बेदाणा सौद्याचा शुभारंभ सभापती शिंदे, संचालक जयाभाऊ नलवडे, शशिकांत नागे, प्रशांत मजलेकर, काडाप्पा वारद, मारुती बंडगर, सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत काढण्यात आला. यावेळी बेदाण्यास प्रति क्विंटर १६ हजार ८०० रुपये दर मिळाला.
यावेळी चेंबरचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, सुरेश पाटील, शरद शहा, मनोहर सारडा, सतीश पटेल, दीपक चौगुले, उपसचिव नितीन कोळसे, नियमन विभागाचे कुमार दरूरे, हरिष पाटील, अभिजीत पाटील, नितीन मर्दा, दिगंबर यादव, पवन चौगुले, शेखर ठक्कर, विनीत गड्डे, वृषभ शेडबाळे आदी उपस्थित होते.
व्यापार्यांनी शेतकर्यांमध्ये विश्वास निर्माण करावा: सुजय शिंदे
सांगली मार्केट यार्डात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून सर्वाधिक माला पाहिजे, यासाठी व्यापार्यांनी शेतकर्यांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया. मुलभूत सुविधा देण्यात बाजार समिती कुठेही कमी पडणार नाही, असे मत सभापती सुहास शिंदे यांनी व्यक्त केले.