दसºयादिवशी ३० ते ३५ कोटी उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:28 PM2017-10-01T23:28:57+5:302017-10-01T23:28:57+5:30

Turnover of 30 to 35 crores on 10th day | दसºयादिवशी ३० ते ३५ कोटी उलाढाल

दसºयादिवशी ३० ते ३५ कोटी उलाढाल

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसºयानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याचे दर स्थिर असले तरी, अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. दसºयाला दोन ते अडीच हजारावर दुचाकी, तर साडेपाचशेवर चारचाकी वाहने नव्याने रस्त्यावर आली. सांगलीच्या बाजारपेठेत अंदाजे ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
बाजारपेठेला खºयाअर्थाने सावरणाºया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाºया दसरा सणाला यावर्षी चांगल्या खरेदीचा अंदाज होता. नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीच्या झळा सहन करणाºया व्यावसायिकांना दसºयाने थोडाफार दिलासा दिला. खरेदीमध्ये सोने-चांदी, दुचाकी वाहने, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप आणि घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना जास्त मागणी होती. दसरा सणाला सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. सध्या सोन्याचा भाव स्थिर असला तरी, म्हणावी तितकी गर्दी सराफ पेठेत दिसत नव्हती. सराफ पेठेत अंदाजे दोन कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही उलाढाल कमीच म्हणावी लागेल.
दसरा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी सुलभ कर्ज पुरवठा केल्याने मोटारसायकली, चारचाकींच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. दुचाकींमध्ये गिअरच्या आणि गिअरलेस अशा दोन्ही प्रकारातील जवळपास दोन ते अडीच हजार गाड्यांची विक्री झाली. तसेच अनेक ग्राहकांनी दसºयाच्या मुहूर्तावर बुकिंग करून दिवाळीला वाहन ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच शेती मशागतीसाठी लागणारे लहान ट्रॅक्टर्स, इतर अत्याधुनिक अवजारांचीही चांगली विक्री झाली.
चारचाकी गाड्यांचीही समाधानकारक विक्री झाली आहे. मारुती व नेक्सा कंपनीच्या ३८८ गाड्यांची विक्री झाल्याचे चौगुले इंडस्ट्रिजचे सिनीयर सेल्स मॅनेजर नीलेश पोतदार यांनी सांगितले; तर कंपन्यांच्या गाड्यांची बºयापैकी विक्री झाली असून, अंदाजे ५५० हून अधिक चारचाकी वाहने दसºयादिवशी रस्त्यावर आली आहेत. वित्तीय कंपन्यांकडून दहा हजारावरील कोणत्याही मोबाईलच्या खरेदीसाठी फायनान्स उपलब्ध करून दिल्याने, ज्या ग्राहकाचा किमान दहा हजारांचा मोबाईल खरेदीचा इरादा होता, त्याने थेट वीस हजारापर्यंतचा मोबाईल खरेदी केला. दहा हजाराच्या पुढील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी ही सुविधा उपलब्ध होती.

Web Title: Turnover of 30 to 35 crores on 10th day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.