तुजारपूर दरोड्यातील टोळीस ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:40 PM2019-05-05T23:40:56+5:302019-05-05T23:41:01+5:30

इस्लामपूर : गेल्या १३ वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात खून, खुनासह दरोडा, जबरी चोरी, ...

Tussauds 'Mokka' in Tuzarpur Dock | तुजारपूर दरोड्यातील टोळीस ‘मोक्का’

तुजारपूर दरोड्यातील टोळीस ‘मोक्का’

Next

इस्लामपूर : गेल्या १३ वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात खून, खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या, घातक हत्यारांनी दुखापत करणे अशा २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची मालिका रचणाऱ्या मुक्या पवारच्या ९ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी मोक्का कारवाईचा दणका दिला. इस्लामपूर उपविभागातील मोक्काची ही पाचवी कारवाई ठरली.
बंजारा बिरज्या पवार (वय २२, रा. साखराळे), आतेश ऊर्फ रोहित ऊर्फ कोथळा वडील, जितेंद्र ऊर्फ येडग्या काळे (२१, गाताडवाडी), विशाल ऊर्फ गुंग्या शेखर काळे (२२, रेठरे धरण), तुषार ऊर्फ चिमण्या इन्कलाब काळे (१९, कुपवाड), विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (बहाद्दूरवाडी), झेलम शिंगºया काळे (करमाळा, सोलापूर), विक्रम ऊर्फ विक्या कोकण्या पवार (कामेरी), धर्मेंद्र सुकन्या काळे (४३, तुजारपूर) व एक विधी संघर्ष बालक अशा ९ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्याखाली ही कारवाई झाली. यातील ६ जण अटकेत असून तिघा फरारी संशयितांचा शोध सुरू आहे.
या टोळीने दहशत बसावी यासाठी १ एप्रिल रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास तुजारपूर (ता. वाळवा) येथील भास्कर तातोबा यादव यांच्या घरावर दरोडा टाकला होता. त्यावेळी या दरोडेखोरांनी घरात घुसून यादव यांना लोखंडी गजाने मारून जखमी केले. त्यांच्या पत्नी रमल यांना चाकूचा धाक दाखवत कपाटातील तसेच अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. दोन नातवांच्या अंगावरील दागिने घेतले. तेथून जाताना यादव यांच्या घराला बाहेरून कडी लावून, शेजारी असणाºया दुसºया घरावर मोठे दगड मारून लोखंडी गजाने दरवाजा उचकटून त्या घरातील यादव यांच्या दोन सुनांच्या अंगावरील दागिने, मोबाईल असा एकूण ३ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. या दरोड्याच्या गुन्ह्याची इस्लामपूर पोलिसांत नोंद आहे.


पाचवा मोक्का
इस्लामपूर पोलीस उपविभागातील मोक्का कायद्याची ही पाचवी सर्वात मोठी कारवाई ठरली. या कारवाईत आतापर्यंत ३० गुन्हेगार जेरबंद करत कृष्णात पिंगळे यांनी या टोळ्यांचे कंबरडे मोडून काढले आहे. इस्लामपुरातील सोन्या शिंदे गँग, अनमोल मदने गँग, कप्या पवार गँग आणि आष्टा शहरातील उदय मोरे गँगला या कारवाईचा दणका बसला आहे.

Web Title: Tussauds 'Mokka' in Tuzarpur Dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.