चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रधर्म शिकवावा, दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:20 PM2020-05-21T12:20:15+5:302020-05-21T12:26:27+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन कसे करावे, कपडे कोणते घालावेत हे शिकविण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळायला शिकविले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरून केली.
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन कसे करावे, कपडे कोणते घालावेत हे शिकविण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळायला शिकविले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरून केली.
चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पेजवर कार्यकर्त्यांना आंदोलनाबाबत सल्ले दिले आहेत. त्याचे स्क्रीनशॉटही जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध करून त्याचा समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देताना म्हटले आहे की, प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:च्या घरीच गॅलरीत, वऱ्हाड्यात किंवा अंगणात दो गज की दुरीचे पालन करीत सदस्यांसह एकत्र यावे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 20, 2020
दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! pic.twitter.com/RC0QOIOfNC
तोंडाला मास्क घालावा, काळी रिबिन, काळा रुमाल, काळी ओढणी बांधावी किंवा काळ्या फिती लावाव्यात. काळे कपडे असतील तर ते परिधान करावेत. मिडियाला याबाबत कळवावे किंवा स्वत: फोटो काढून ते माध्यमांना पाठवावेत. उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार असे फलकही लावावेत.
कोविड-१९ प्रादुर्भावाच्या या कठीण प्रसंगी अवघा महाराष्ट्र एकजुटीने लढा देत असताना, कोणीही स्वार्थासाठी राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढायची आहे#WarAgainstVirus@NCPspeakspic.twitter.com/V4dDuU09RR
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 20, 2020
या गोष्टीवर जयंत पाटील यांनी गुरुवारी ट्विट करताना म्हटले आहे की, चंद्रकांतदादांनी भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते तर संयुक्तिक ठरले असते. दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी असा शायराना टोलाही त्यांनी लगावला.
दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली
सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांमधील हे ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. दोन्ही बाजुचे समर्थक व कार्यकर्तेही ट्विटरवर भिडले आहेत. राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू असताना आता दिग्गज नेत्यांच्या सहभागाने हा संघर्ष वाढला आहे.