निकालाच्या सूत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी, अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:39+5:302021-07-18T04:19:39+5:30

फोटो १७ अनुश्री विसपुते फोटो १७ विनित लुगडे फोटो १७ बीयू पाटील संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीचा ...

Twelfth grade students' sleep was disturbed by the result formula, tenth, eleventh grade increased anxiety | निकालाच्या सूत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी, अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

निकालाच्या सूत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी, अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

Next

फोटो १७ अनुश्री विसपुते

फोटो १७ विनित लुगडे

फोटो १७ बीयू पाटील

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दहावीचा निकाल लागताच बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. बारावीच्या निकाल निश्चितीसाठी दहावी व अकरावीच्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे अकरावीला टाईमपास केलेले विद्यार्थी गॅसवर आहेत.

दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला. बारावीची गुणनिश्चिती सध्या सुरू आहे. त्यासाठी दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण गृहीत धरले जाणार आहेत. दहावी व अकरावीतून जेमतेम बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची चिंता या सुत्रामुळे वाढली आहे. विशेषत: दहावीला `गुण उधळलेल्या` विद्यार्थ्यांना टक्केवारीची चिंता सतावतेय.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी सीबीएसई

मुले ९० , मुली ६०

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड

मुले १९,९१०, मुली १४७५०

कोट

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

काही विद्यार्थी कोरोना संसर्गामुळे परीक्षेला नव्हते. काहींना अंतर्गत मूल्यमापनासाठी उपस्थित राहता आले नाही, त्यामुळे अडचणी आहेत. यातूनही शासनाने मार्ग काढून अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे निकाल चांगला व पारदर्शी लागण्याची अपेक्षा आहे. कोरोनामध्ये परीक्षेच्या मूल्यमापनासाठी शासनाचा निर्णय योग्यच आहे. पुढील शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांऐवजी सीईटीचे गुण महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी आता त्यावर फोकस ठेवावा.

प्रा. बी. यू. पाटील, मिरज महाविद्यालय, मिरज

३० टक्के गुण सूत्र बिघडवणार

बारावीचा निकाल मूल्यमापनाने लावणे योग्य नाही. सध्या परिस्थिती नकारात्मक असली, तरी विद्यार्थ्यांच्या क्षमतेची चाचपणी आवश्यक होती. नव्या पॅटर्नमुळे महाविद्यालयांनाच आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवावी लागेल. ३०-३०-४० पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थांना न्याय मिळण्याबाबत साशंकता आहे.

- अनुश्री विसपुते, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

दहावी आणि अकरावीच्या गुणांच्याआधारे बारावीचा निकाल लावणे योग्य नाही. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. दहावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याने बारावीला चांगला अभ्यास केलेला असतो, पण नव्या पॅटर्ननुसार दहावीच्या गुणांवर त्याची गुणवत्ता निश्चित होणे दुर्दैवी आहे.

- विनित लुगडे, विद्यार्थी, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली.

Web Title: Twelfth grade students' sleep was disturbed by the result formula, tenth, eleventh grade increased anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.