सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.६३ टक्के;उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 08:03 PM2020-07-16T20:03:39+5:302020-07-16T20:15:36+5:30
बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९५.९९ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात ५.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आॅनलाईन निकाल नेट कॅफेमध्ये व मोबाईलवरून पाहिला. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांनी शाळेत फारशी गर्दी केलीच नाही.
सांगली : बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९५.९९ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात ५.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आॅनलाईन निकाल नेट कॅफेमध्ये व मोबाईलवरून पाहिला. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांनी शाळेत फारशी गर्दी केलीच नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला. बारावी परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखेतील ३४ हजार २६८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ हजार ३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ९१.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागीलवर्षी सांगली जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला होता. यावर्षी निकालामध्ये ५.०८ टक्के वाढ झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला ही आनंदाची वार्ता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन💐 pic.twitter.com/Fa5n8uwb1A
गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९५.९९ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात विज्ञान विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.०३ टक्के, तर सर्वात कमी कला शाखेचा ८१.३५ टक्के लागला. वाणिज्य विभागाचा ९४.६७ टक्के निकाल लागला आहे. किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ९०.२९ टक्के निकालाची नोंद झाली.
शाखानिहाय निकाल...
शाखा उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
- विज्ञान १४९५७ ९८.०३
- कला ९०३३ ८१.३५
- वाणिज्य ५८३८ ९४.६७
- व्यावसायिक १५७१ ९०.२९
पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३४.८१ टक्के
जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणून एक हजार ६९५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ३४.८१ टक्के इतकी आहे.