दोन वर्षांत बारा शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Published: April 16, 2017 11:14 PM2017-04-16T23:14:02+5:302017-04-16T23:14:02+5:30

जत तालुक्यातील स्थिती : दुष्काळाचा फेरा सुटता सुटेना; धक्कादायक घटनांची मालिका कायम

Twelve farmers suicides in two years | दोन वर्षांत बारा शेतकऱ्यांची आत्महत्या

दोन वर्षांत बारा शेतकऱ्यांची आत्महत्या

Next



जयवंत आदाटे ल्ल जत
कर्जाला कंटाळून व कूपनलिकेला पाणी न लागल्याने खिलारवाडी (ता. जत) येथील शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्यातील वास्तव समोर येऊ लागले आहे. मागील दोन वर्षात येथील बारा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
भौगोलिक असमतोल, कमी प्रमाणात पडणारा पाऊस व जवळपास बारमाही वाहणारी नदी नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करावा लागत आहे. बॅँका आणि पतसंस्था व खासगी सावकारांचे थकीत कर्ज, फळबागेतील उत्पन्नातून आलेले नुकसान, कूपनलिकेचे अचानक बंद झालेले पाणी, नवीन कूपनलिकेस पाणी न लागणे आदी कारणांमुळे येथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करण्याच्या धक्कादायक घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. परंतु शासनस्तरावर त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही.
शासनाने कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करून, त्यांना आत्महत्येपासून परावृृत्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र हा सधन भाग समजला जात आहे. त्यातील जत तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याने येथील वास्तव हळूहळू समोर येऊ लागले आहे.
२०१५ मध्ये येथील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०१६ मध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर २०१७ मध्ये एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. जत तालुक्यास वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले, तर तालुक्याच्या काही भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. येथील राजकारण आजपर्यंत म्हैसाळ योजनेभोवती फिरत राहिले. प्रत्येक निवडणुकीत त्याचा राज्यकर्त्यांनी सोयीस्करपणे वापर केला. टोकाचा राजकीय संघर्ष, राजकीय अनास्था यामुळे म्हैसाळ योजनेचे काम आजपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी...
नाव वय गाव तारीख
मधुकर गोविंद घेरडे ४८ काशिलिंगवाडी १0-२-२0१५
भगवान तुकाराम शिंदे २८शेगाव ८-४-२0१५
शिवकांत रेवाप्पा चनगोंड ४० जाडरबोबलाद १६-९-२0१५
श्रीकांत कोंडीबा चौगुले ३५ दरीबडची ३-११-२0१५
रमेश लिंगाप्पा पुजारी ४० गुड्डापूर १-११-२0१५
संजय ज्ञानू पांढरे ३५ कुडनूर ९-१२-२0१५
आप्पासाहेब तम्माण्णा हुबळी ४० बिळूर ३१-५-२0१६
मारुती मल्लाप्पा हळगे ४५ डफळापूर३0-८-२0१६
आप्पासाहेब परकाप्पा मगदूम ३८ सिंदूर२६-५-२0१६
बसगोंडा रामाण्णा तंगडी ४२ मुचंडी २६-५-२0१६
भैराप्पा आण्णाप्पा कोडलकर ३७खिलारवाडी १४-४-२0१७
पदुबाई भैराप्पा कोडलकर ३१ खिलारवाडी १४-४-२0१७

Web Title: Twelve farmers suicides in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.