कोकरूडमध्ये संचारबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी चौवीस जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:04+5:302021-04-21T04:26:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : कोकरूड पोलीस ठाणेअंतर्गत केलेल्या नाकाबंदी नियम तोडल्याच्या कारणावरून विविध प्रकारचे २४ गुन्हे दाखल केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : कोकरूड पोलीस ठाणेअंतर्गत केलेल्या नाकाबंदी नियम तोडल्याच्या कारणावरून विविध प्रकारचे २४ गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या हाकेला साथ देत व्यापाऱ्यांनी सकाळी अकरापासून व्यवसाय बंद केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी कोकरूड, शेडगेवाडी फाटा, चरण, आरळा येथे नाकाबंदी सुरू करून कडक अंमलबजावणी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकाने सुरू ठेवल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवारी अत्यावश्यक सेवा सोडून दुकाने सुरू ठेवल्याने नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर विना मास्कप्रकरणी १३ जणांवर कारवाई करून साडेसहा हजार दंड केला आहे. एक मोटारसायकल जप्त केली आहे. सोमवारी रात्रीपासून नव्याने करण्यात आलेल्या नियमावलीची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी दिली. कोकरूड, शेडगेवाडी फाटा, चरण, आरळा या प्रमुख बाजारपेठेत सर्व गावांतील व्यवहार सकाळी अकरा वाजल्यापासून बंद करण्यात आले. ज्यांना नवीन नियमावली माहीत नव्हती अशा उगीच फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम सुरू होते.