खोतवाडी खूनप्रकरणी २० जणांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:03 PM2017-10-02T16:03:11+5:302017-10-02T16:07:56+5:30
खोतवाडी (ता. मिरज) येथे कलावती उदय पिसे (वय ४५, रा. खणभाग, सांगली) या महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना अजूनही यश आले नाही. आतापर्यंत २० संशयितांकडे चौकशी झाली आहे. सांगली ते खोतवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. कलावती यांच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरुन चौकशी केली. पण तरीही काहीच धागेदोरे लागले नाहीत. सध्या तपास जैसे-थेच आहे.
सांगली : खोतवाडी (ता. मिरज) येथे कलावती उदय पिसे (वय ४५, रा. खणभाग, सांगली) या महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना अजूनही यश आले नाही. आतापर्यंत २० संशयितांकडे चौकशी झाली आहे. सांगली ते खोतवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. कलावती यांच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरुन चौकशी केली. पण तरीही काहीच धागेदोरे लागले नाहीत. सध्या तपास जैसे-थेच आहे.
कलावती पिसे यांचा गेल्या महिन्यात शिरगाव-कवठेएकंद रस्त्यावरील खोतवाडी हद्दीतील ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला होता. त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्या खणभागात भाड्याने खोली घेऊन रहात होत्या. वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यांना मुले नाहीत.
पतीच्या निधनानंतर त्या एकट्यात रहात होत्या. पंचमुखी मारुती मंदिरासमोर पूजेचे साहित्य विक्री करुन त्या उदरनिर्वाह करीत होत्या. गेल्या महिन्यात त्या अचानक घरातून गायब झाल्या होत्या. त्यांच्या दीरासह अन्य नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र त्यांचा कुठेच सुगावा लागला नाही. तब्बल चार दिवसानंतर त्यांचा खोतवाडीत मृतदेह आढळून आला. त्या बेपत्ता असल्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात होती. यावरुन मृतदेहाची ओळख पटली होती.
ह्यनाजूकह्ण संबंधाच्या संशयावरुन कलावती यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करुन पोलिसांनी तपासाला दिशा दिली. अगदी जवळच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या प्रत्येक कॉलची माहिती काढून कॉल करणाºयांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी कलावती यांना कॉल का केला? याबद्दल चौकशी केली.
सांगली ते खोतवाडी मार्गावर जिथे-जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तेथील फुटेज ताब्यात घेऊन तपासणी केली. यामध्ये कलावती कोणासोबत तरी जाताना दिसतात, असे काहीचआढळून आले नाही. आतापर्यंत २० जणांची चौकशी झाली आहे. परंतु या खुनाचा उलघडा होण्यास मदत होईल, असा कोणताही धागा सापडला नाही. तब्बल २० ते २५ पोलिसांचे पथक तपासात आहे.
मोबाईल लंपास
कलावती यांचा मोबाईल गायब आहे. कदाचित मारेकºयांनी तो लंपास केल्याचा संशय आहे. घटनेदिवशी त्या साडेदहा वाजता घरातून बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे. त्या कोणासोबत होत्या? त्यांच्याकडे कोण आले होते का? खोतवाडीत त्या कशा गेल्या? या प्रश्नांची उत्तरे अजूनही पोलिसांना मिळालेली नाहीत.