मिरजेतील बेदाणा व्यापाऱ्याची एकवीस लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 07:10 PM2019-08-25T19:10:56+5:302019-08-25T19:12:37+5:30
प्रसाद यांनी बेदाण्याची रक्कम देण्यास नकार दिला म्हणून अग्रवाल यांनी शनिवारी प्रसाद यांच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़ पोलीस तपास करीत आहेत़.
कुपवाड : मिरज शहरातील गणेशनगर येथील एका बेदाणा व्यापाºयाची दिल्लीतील गोयल ट्रेडिंग कंपनीचे मालक राजेंद्र प्रसाद यांनी ७८९ बेदाणा बॉक्सची साडेएकवीस लाखाची फसवणूक केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली़ याप्रकरणी दिल्लीतील बेदाणा व्यापाºयावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मिरज शहरातील गणेशनगर येथील बेदाणा व्यापारी सुमित राजेंद्र अग्रवाल (वय ३२) यांचा यश ट्रेडिंग नावाने बेदाण्याचा उद्योग आहे़ त्यांचा दिल्लीतील व्यापाऱ्यांशी बेदाण्याचा व्यापार सुरू असतो़ त्यानुसार अग्रवाल यांनी २३ फेब्रुवारी २०१९ ते १४ एप्रिल २०१९ च्या दरम्यान कुपवाड एमआयडीसीलगत असलेल्या एका कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला ७८९ बॉक्स बेदाणा सावळीतील राम कॅरिंग कॉर्पोरेशनच्या ट्रकमध्ये भरून दिल्लीतील रूई मंडी येथील राजेंद्र प्रसाद यांच्या गोयल ट्रेडिंग कंपनीला पाठविला़ या बेदाणा मालाची किंमत २१ लाख ३४ हजार १९१ रुपये आहे़ या पाठविलेल्या मालाच्या रकमेची अग्रवाल यांनी प्रसाद यांच्याकडे वारंवार मागणी केली़ परंतु प्रसाद यांनी विश्वास संपादन करून घेतलेल्या या मालाची रक्कम आजतागायत दिली नाही़.
प्रसाद यांनी बेदाण्याची रक्कम देण्यास नकार दिला म्हणून अग्रवाल यांनी शनिवारी प्रसाद यांच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़ पोलीस तपास करीत आहेत़. फसवणूक होणाºया घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.