वीस हजार शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी ॲपद्वारे केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:09+5:302021-09-08T04:33:09+5:30

सांगली : ई-पीकपाहणी ॲपमधून आजवर २० हजार ५०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ॲप डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १९ हजार १३३ ...

Twenty thousand farmers registered through e-crop inspection app | वीस हजार शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी ॲपद्वारे केली नोंदणी

वीस हजार शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी ॲपद्वारे केली नोंदणी

Next

सांगली : ई-पीकपाहणी ॲपमधून आजवर २० हजार ५०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ॲप डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १९ हजार १३३ शेतकऱ्यांनी पिकांच्या नोंदी केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

या ॲपमुळे शेतकरी स्वत: सातबाऱ्यावर पिकाची नोंदणी करू शकणार आहेत. खानापूर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड केले आहे. तालुकानिहाय नोंदणी केलेले शेतकरी असे - आटपाडी दोन हजार ८७३, कडेगाव - दोन हजार ४६१, कवठेमहांकाळ ८८०, खानापूर तीन हजार ५००, जत एक हजार २१८, तासगाव एक हजार ९०२, पलूस एक हजार ५४५, मिरज एक हजार ७००, वाळवा तीन हजार २१२, शिराळा एक हजार ३०३. ॲपच्या अधिक माहितीसाठी ०२०-२५७१२७१२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Web Title: Twenty thousand farmers registered through e-crop inspection app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.