दिलासादायक! जिल्ह्यात २८ दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 03:29 PM2022-01-29T15:29:34+5:302022-01-29T15:30:00+5:30

सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५०८३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४८४९ गृहविलगीकरणात आहेत. तर दवाखान्यात आणि कोविड केअर सेंटरमध्ये केवळ २३४ रुग्णांचा समावेश

Twice as many people recover than corona patients In Sangli district | दिलासादायक! जिल्ह्यात २८ दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

दिलासादायक! जिल्ह्यात २८ दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

Next

सांगली : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने सुरू असून, तब्बल २८ दिवसांनंतर सांगली जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गुरुवारी १९४२ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये एकूण ३८२ रुग्ण आढळले, तर प्रकृती ठणठणीत होऊन ८४२ जण घरी परतले, ही बाब दिलासादायक असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५०८३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४८४९ गृहविलगीकरणात आहेत. तर दवाखान्यात आणि कोविड केअर सेंटरमध्ये केवळ २३४ रुग्णांचा समावेश आहे.

मिरज शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत ३४९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. १५९३ व्यक्तींची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ३२६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन्ही मिळून १९४२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३८२ नवे रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १९.६७ टक्के आहे. दरम्यान, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी १०३ रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. १७ रुग्ण मध्यम लक्षणाची, परंतु ऑक्सिजनवर आहेत, तर ७५ रुग्ण मध्यम लक्षणाची, परंतु विनाऑक्सिजनवर आहेत, तर ४८४९ जणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. हे सर्व रुग्ण होम आयसोलेशनमधील आहेत. उर्वरित २३४ रुग्ण रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याचा मृत्यू दर ०.२२ टक्के

सद्य:स्थितीत सांगली जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर ०.२२ टक्क्यांवर आहे. २०२० मध्ये कोरोनाचा मृत्यूदर ३.६४ टक्के तर २०२१ मध्ये २.४१ टक्के मृत्यूदर होता. जानेवारी २०२२ मध्ये मृत्यूदर घटला आहे, हे जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे, अशी माहिती जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असून, मृत्यूच्या सत्रालाही ब्रेक लागला आहे. कोरोना पॉझिटिव्ह ९५ टक्के रुग्ण घरातच बरे होत आहेत. असे असले, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. बेफिकिरी बाळगून कोरोनाला निमंत्रण देऊ नका. कोरोनाचे नियम पाळा. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने लस घ्यावी. -जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

Web Title: Twice as many people recover than corona patients In Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.