अतिघाई ठरतेय जीवघेणी ; अडीच कोटीचा दंड, तरीही बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:22 PM2020-02-26T23:22:21+5:302020-02-26T23:25:50+5:30

वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे.

Two and a half million fine, nevertheless dishonest | अतिघाई ठरतेय जीवघेणी ; अडीच कोटीचा दंड, तरीही बेशिस्त

अतिघाई ठरतेय जीवघेणी ; अडीच कोटीचा दंड, तरीही बेशिस्त

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरातील कारवाई : नियम मोडल्याने वाढली जिल्ह्यातील अपघातांची शक्यता

शरद जाधव ।
सांगली : रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने ओव्हरटेक करणे, तसेच शहरातील प्रमुख मार्गावर सिग्नल असतानाही त्याचे पालन न करता सिग्नल तोडण्याची वाहनधारकांची मानसिकताच जीवघेणी ठरत आहे. वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे.

जिल्ह्यातून तीन राष्टÑीय महामार्ग, दोन आंतरराज्य मार्ग, तर ११ राज्यमार्ग जातात. यातील रस्त्यांची स्थितीही यथातथाच आहे. त्यात बहुतांश मार्गांचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना सावकाशपणे वाहन चालवावे लागते. या मार्गावर अती वेगाने वाहन चालविणाºयावर कारवाई होण्याबरोबरच सेवा मार्गाचा वापर टाळणे, वेगमर्यादा न सांभाळणे यासह इतर कारणांनी अपघाताची शक्यता वाढत असते. पण याच्या उलट परिस्थिती शहरात आहे. शहरातील प्रमुख रस्ते चकाचक झाल्याने सर्रास वाहतूक नियम मोडले जातात. विशेषत: सिग्नल तोडण्यात वाहनचालक अग्रभागी आहेत. तरुणांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होण्याबरोबरच धोकादायकरितीने ओव्हरटेक केले जात असल्यानेही अपघात होत आहेत.

यावर पर्याय म्हणून पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सांगली व मिरज शहरात काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात शहरातील प्रमुख चौकांमध्ये प्लास्टिकचे दुभाजक बसविण्यात आले आहेत, तर देशातील प्रमुख शहरात असलेली ‘लेफ्ट साईड फ्री’ संकल्पनाही राबविण्यात आली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. नव्यानेच बसविलेल्या सीसीटीव्हीमुळे थेट नियम मोडणाºया वाहनचालकाचा वाहन क्रमांक मिळत असल्याने, कारवाई सोपी होत आहे. असे असले तरी नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. शहरात सिग्नलचे सेकंद पूर्ण होण्याअगोदरच भरधावपणे वाहन पुढे रेटल्यानेही अपघात होत आहेत.

‘स्पीड गन’ने टिपली : २९८५ भरधाव वाहने
अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी व शहरातील वाहतूक नियोजनासाठी सांगलीतील वाहतूक शाखेकडे ‘इंटरसेप्टर’ वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांत वेगमर्यादेचे पालन न करणाºया वाहनांवर ‘स्पीड गन’च्या माध्यमातून कारवाई केली जाते. केवळ तीन महिन्यात सांगली व मिरज शहरात भरधाव वाहने चालविणाºया २९८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही सांगली - मिरज रोड, सांगली-कोल्हापूर रोड, मिरज-पंढरपूर रोडवर सुसाट वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

 

अपघातामध्ये तरुण मुलांची संख्या अधिक असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन हातात देताना अगोदरच संभाव्य परिणाम सांगावेत. तरुण मुलांमध्ये वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पालकांनी आवर्जून आपल्या मुलांवर लक्ष ठेवल्यास त्यांची ही सवय जाऊ शकते. महाविद्यालयीन स्तरावर मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे.
- पूनम गायकवाड, समुपदेशक

महाविद्यालयीन स्तरावर एनएसएसच्या माध्यमातून मुलांना वाहतूकविषयक नियमांची माहिती दिली जाते. शिवाय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घडवून, अपघात, त्याचे परिणाम याबाबतही सजग केले जाते. तरीही वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी आपली जबाबदारी समजून वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टळण्यास मदत होणार आहे.
- दिलीप कोथळे, प्राध्यापक

Web Title: Two and a half million fine, nevertheless dishonest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.