भिलवडीतून सळी चाेरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:50+5:302020-12-15T04:42:50+5:30
सांगली : भिलवडी येथील चितळे डेअरीसमोर सुरू असलेल्या बांधकामावरून सळी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ...
सांगली : भिलवडी येथील चितळे डेअरीसमोर सुरू असलेल्या बांधकामावरून सळी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. राजेश ऊर्फ आदेश भीमराव जाधव (वय २७) व मोहन गुजर माळी (दोघेही रा. भिलवडी स्टेशन, ता. पलूस) अशी संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व सळी असा ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीचे पथक रविवारी गस्तीवर असताना भिलवडी येथील चितळे डेअरीसमाेर सुरू असलेल्या बांधकामावरून रात्रीच्यावेळी चोरलेली सळी विक्री करण्यासाठी सांगली कर्नाळ रोडवरून येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून वाहन थांबविले. चौकशीत दोघांनी सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, नंतर दीड महिन्यापूर्वी बांधकामावरून सळी चोरल्याची कबुली दोघांनी दिली. भिलवडी पाेलीस ठाण्यात सागर सीताराम यादव यांनी फिर्याद दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करत दोघांवर कारवाई केली.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक रविराज फडणीस, अभिजित सावंत, मारुती साळुंखे, सुनील चौधरी, मच्छिंद्र बर्डे, अरुण सोकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.