सांगली: दोन मोटारींची समोरासमोर धडक; तलाठ्यासह चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:28 PM2022-10-19T17:28:20+5:302022-10-19T17:28:39+5:30

समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Two cars collide head-on; Four seriously injured in Sangli | सांगली: दोन मोटारींची समोरासमोर धडक; तलाठ्यासह चौघे गंभीर जखमी

सांगली: दोन मोटारींची समोरासमोर धडक; तलाठ्यासह चौघे गंभीर जखमी

googlenewsNext

ढालगाव : विजयपूर-गुहागर मार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटारींमधील चौघे जखमी झाले. हा अपघात मंगळवार दि. १८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. जखमींमध्ये इस्लामपूरचे गावकामगार तलाठी निखिल पाटील व त्यांच्या पत्नीचा समावेश आहे. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.

इस्लामपूरचे तलाठी निखिल पाटील हे पत्नीसह मोटारीतून (क्र. एमएच १० सीएक्स ९४३४) उटगी (ता. जत) येथे निघाले होते. महामार्गावर नागजजवळील गायकवाड वस्तीजवळ समोरून आलेल्या मोटारीच्या (क्र. एमएच १० एएन ०७८६) चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात पाटील यांच्यासह त्यांची पत्नी तसेच दुसऱ्या मोटारीतील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात निखिल पाटील यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे.

समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात पाटील यांच्या मोटारीचा चक्काचूर झाला आहे, तर दुसऱ्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

Web Title: Two cars collide head-on; Four seriously injured in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.