मिरजेत बांधकाम व्यावसायिकाला दोन कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:51+5:302021-04-28T04:29:51+5:30
संतोष आरवट्टगी यांनी त्यांची काकू श्रीमती डॉ. सरोजनी सॅम्युअल आरवट्टगी (वय ७३, रा. गांधी चौक मिरज), डॉ. विनय ...
संतोष आरवट्टगी यांनी त्यांची काकू श्रीमती डॉ. सरोजनी सॅम्युअल आरवट्टगी (वय ७३, रा. गांधी चौक मिरज), डॉ. विनय सॅम्युअल आरवट्टगी (५१, रा. शंभर फुटी रोड विश्रामबाग) व डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी सॅम्युअल आरवट्टगी (४८, रा. चिनचिनीम सालकेट, गोवा) या तिघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर पोलीस चौकीमागे श्रीमती डॉ. सरोजनी आरवट्टगी, डॉ. विनय आरवट्टगी व डॉ. सुयोग आरवट्टगी यांचे हॉस्पिटल आहे. तिघांच्या मालकीची रस्त्यालगत ३० हजार चौरस फूट जमीन आहे. या मिळकतीचे विकसन करण्यासाठी तिघांनी दोन कोटी पाच लाख रुपये घेऊन संतोष यांच्याशी दोन वर्षांपूर्वी विकसन करारपत्र केले. मात्र, करारपत्र केल्यानंतर जागेचा ताबा सोडण्यास नकार देत जमिनीची २० कोटी रुपये किंमत मागितली. संतोष यांनी जादा रक्कम देण्यास नकार दिल्याने ‘तू येथे आलास तर हातपाय तोडून टाकतो’, अशी धमकी देत दोन कोटी, पाच लाखांची फसवणूक केल्याचे संतोष आरवट्टगी यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मिरज न्यायालयाच्या आदेशाने गांधी चौकी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.