जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:37+5:302021-04-08T04:27:37+5:30
सांगली : जिल्ह्यात ८ व ९ एप्रिलला विजांच्या कडकडाटासह काहीठिकाणी तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला ...
सांगली : जिल्ह्यात ८ व ९ एप्रिलला विजांच्या कडकडाटासह काहीठिकाणी तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. या काळात कमाल तापमानात काहीअंशी घट होण्याचाही अंदाज आहे.
सांगली जिल्ह्याच्या किमान तापमानात बुधवारी विक्रमी वाढ झाली. किमान तापमान २५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आजवरचे उच्चांकी किमान तापमान १३ एप्रिल २०१३ रोजी २३.३ इतके नोंदले गेले होते. त्यामुळे या विक्रमाच्या जवळ सध्या हे तापमान गेले आहे. दुसरीकडे बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मंगळवारच्या तुलनेत ते एक अंशाने कमी झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात बुधवारी अंशत: ढगाळ वातावरण होते. गुरुवारी व शुक्रवारीही ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट व काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर १३ एप्रिलपर्यंत अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे.