सांगलीत बाळूमामा मंदिरातील हिशोब मागितला म्हणून दोन गटांत मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:46 PM2023-08-17T17:46:14+5:302023-08-17T17:46:31+5:30

सांगली : शहरातील शिवोदयनगर येथे असलेल्या बाळूमामा मंदिर देवस्थानमधील पैशाचा हिशेब मागितल्यावरून अकरा जणांनी तरुणांसह अन्य दोघांना बेदम मारहाण ...

two groups fought as they demanded an account of the Balumama temple In Sangli | सांगलीत बाळूमामा मंदिरातील हिशोब मागितला म्हणून दोन गटांत मारामारी

सांगलीत बाळूमामा मंदिरातील हिशोब मागितला म्हणून दोन गटांत मारामारी

googlenewsNext

सांगली : शहरातील शिवोदयनगर येथे असलेल्या बाळूमामा मंदिर देवस्थानमधील पैशाचा हिशेब मागितल्यावरून अकरा जणांनी तरुणांसह अन्य दोघांना बेदम मारहाण केली. रविवार, दि. १३ रोजी मंदिराजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

विशाल पोपट यमगर (रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आर्यन जाधव, अजय गोसावी, प्रशांत गोसावी, अभिषेक गोसावी, पार्थ जाधव, विक्रांत गोसावी, दीपक पाटील, सौरभ गोसावी, महेश्वर भोपी, दिनकर गोसावी, भगवान गोसावी (सर्व रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यमगर हा जुन्या बुधगाव रोडवरील शिवोदयनगर येथील बाळुमामा मंदिरात गेला होता. त्यावेळी संशयित तेथे होते. यावेळी विशालने देवस्थानमधील पैशाचा हिशेब संशयितांकडे मागितला. याचा राग आल्याने अकरा जणांनी विशालसह परमेश्वर दगडू थोरात आणि अक्षय अशोक यमगर यांना बेदम मारहाण केली.

तर अश्विनी अनंत जाधव यांनी दिलेल्या फियादीनुसार संशयित विशाल यमगर आणि अन्य दोन सहकाऱ्यांनी फिर्यादीसह त्यांच्या आई आणि मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. यामध्ये अश्विनी जाधव, द्रौपदी भगवान गोसावी, पार्थ अनंत जाधव हे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. दोन्ही गटांच्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: two groups fought as they demanded an account of the Balumama temple In Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.