दोन सावकारांना अटक, सांगलीत कारवाई : तक्रारी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:43 PM2018-09-08T14:43:58+5:302018-09-08T14:50:33+5:30
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सांगली : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
विशाल विलास कुडचे
विशाल विलास कुडचे (वय २७, रा. समृद्धी कॉलनी, विश्रामबाग) व गणेश अनिल वायदंडे (२४, गांधी चौक, मिरज) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. गळतगे यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये कुडचे याच्याकडून २ लाख ९२ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात दोन कोरे धनादेश व शंभर रुपयांचा मुद्रांक दिला होता.
गणेश अनिल वायदंडे
कुडचे याने चार महिन्याच्या व्याजापोटी एक लाख आठ हजार रुपये कापून घेऊन उर्वरित रक्कम गळतगे यांना दिली होती. तरीही गणेश वायदंडे व कुडचे यांनी गळतगे कुटुंबियांना वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्यांच्या त्रासाला कंटाळून गळतगे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार केली होती. शर्मा यांच्या आदेशानंतर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.