सत्तेसाठी दोन मंत्र्याना दारोदारी फिरावे लागले

By admin | Published: November 3, 2015 11:19 PM2015-11-03T23:19:53+5:302015-11-04T00:10:18+5:30

संजू परब यांची टीका : युतीचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात

Two ministers had to return to power for power | सत्तेसाठी दोन मंत्र्याना दारोदारी फिरावे लागले

सत्तेसाठी दोन मंत्र्याना दारोदारी फिरावे लागले

Next

सावंतवाडी : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत दोन मंत्र्यांना दारोदारी फिरावे लागले, आमची सत्ता आली नाही, पण मतांची टक्केवारी वाढली असून युतीचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही विरोधी पक्षातच बसण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असे मत दोडामार्ग नगरपंचायतचे काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब यांनी मांडले. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी गुरू सावंत, रवींद्र म्हापसेकर, रवींद्र मडगावकर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, दोडामार्ग नरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले असून, विधानसभा निवडणुकीत दोडामार्गमध्ये आमची टक्केवारी अवघी १५ टक्के होती. ती नगरपंचायत निवडणुकीत ४९ टक्क्यावर गेली आहे. काँग्रेसचे दोन उमेदवार अवघ्या १ व १५ मतांनी पडले अन्यथा दोडामार्गमध्ये वेगळे चित्र पाहता आले असते, असेही परब म्हणाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. मात्र, शिवसेना-भाजप युतीचे शिक्षणमंत्री तसेच पालकमंत्री आमदार माजी आमदार हे दोडामार्गमध्ये ठाण मांडून होते. प्रचार सभा घेतल्या. पालकमंत्र्यांनी तर दारोदारी जाऊन प्रचार केला. तसेच पैशाचा मोठ्या प्रमाणात वापरही केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक घराघरातून एका माणसाला नोकरीचे आमिष दोडामार्गच्या निवडणुकीत दाखवले. त्यांनी दिलेले आमिष आम्ही पूर्ण करून घेऊच, असे सांगत तावडेंचे विधान निवडणुकीच्या काळात चुकीचे आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपने पूर्णपणे सत्तेचा वापर केला. अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दादागिरी केली. काँग्रेस उमेदवारांच्या घरात जाऊन घुसत होते. हे योग्य नाही. प्रशासनाच्या दादागिरीचा हा विजय असल्याचेही परब म्हणाले. मात्र, असे असले तरी युतीतील काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क केला असून, जर नगराध्यक्ष आमचा बसला नाही, तर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे भ्रमणध्वनीवरून आम्हाला सांगितल्याचा दावा, संजू परब यांनी केला आहे. (प्रतिनिधी)


केसरकर म्हापसेकरांमुळे तरले
पालकमंत्री दीपक केसरकर यांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागला. त्यानंतरच कुठे तरी शिवसेनेच्या पाच जागा आल्या. पण यात केसरकरांपेक्षा राजन म्हापसेकर यांचा वाटा महत्त्वाचा असून ते जर दोडामार्गमध्ये नसते, तर चित्र उलटे झाले असते. पालकमंत्र्यांना तोंड दाखवणे मुश्किल झाले असते, असा अंदाज परब यांनी व्यक्त केला.

Web Title: Two ministers had to return to power for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.