आणखी दोन जोडप्यांची ‘डीएनए’ चाचणी
By admin | Published: April 21, 2017 03:13 AM2017-04-21T03:13:31+5:302017-04-21T03:13:31+5:30
म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्या प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आणखी दोन जोडप्यांचे नमुने ‘डीएनए’
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्या प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आणखी दोन जोडप्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी घेतले आहेत. मुलीचा गर्भ असल्याने त्यांनी गर्भपात केला असून, यामध्ये चिकुर्डे (ता. वाळवा) व कुंडल (ता. पलूस) या गावच्या जोडप्यांचा समावेश आहे. पोलिसांना आतापर्यंत यातील २१ जोडपी शोधून काढण्यात यश आले आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे ‘रॅकेट’ उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगतच पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर १९ भ्रूण सापडले होते. त्यांचे अवशेष ‘डीएनए’साठी यापूर्वीच पाठवले आहेत. (प्रतिनिधी)