corona virus : वाळवा तालुक्यात आणखी दोन महिलांना कोरोना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:53 AM2020-06-12T10:53:16+5:302020-06-12T14:12:43+5:30
वाळवा तालुक्यात मुंबईतून आलेल्या आणखी दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यामध्ये येलूर येथील २६ वर्षीय परिचारिकेचा तर राजारामनगर येथील ४१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.तिच्या पतीचा अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ.साकेत पाटील यांनी सांगितले.
इस्लामपूर: वाळवा तालुक्यात मुंबईतून आलेल्या आणखी दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.यामध्ये येलूर येथील २६ वर्षीय परिचारिकेचा तर राजारामनगर येथील ४१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.तिच्या पतीचा अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ.साकेत पाटील यांनी सांगितले.
येलूर येथील परिचारिका ही आपल्या वाडीलांसोबत ३० मे रोजी मुंबईतून गावी आली होती.तिच्या ६५ वर्षीय वडिलांना कोरोना बाधा झाली आहे.त्यांच्यावर मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात ही मुंबईत परिचारिका म्हणून काम करणारी २६ वर्षीय युवतीसुद्धा बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.
राजारामनगर-इस्लामपूर येथे ४ जूनला पती-पत्नी मुंबईतून आले होते.४१ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने तिची तपासणी केल्यावर ती बाधीत निघाली.तर तिच्या पतीचा अहवाल प्रलंबित आहे.तालुक्यात सध्या इस्लामपूर-२,वाटेगाव-२,येलूर-२,ठाणापुडे-१,आष्टा-२ असे एकूण ९ रुग्ण उपचाराखाली आहेत.