नियमभंगप्रकरणी तासगावात दोन दुकानांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:36+5:302021-05-05T04:43:36+5:30
ते म्हणाले, जनतेसाठी भाजीपाला आणि किराणा साहित्य घरपोहोच पुरवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सक्रिय आहे. कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत शहरात कोरोनाबाधित रुग्णांची ...
ते म्हणाले, जनतेसाठी भाजीपाला आणि किराणा साहित्य घरपोहोच पुरवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सक्रिय आहे. कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी नागरिकांनी एकत्रित येत तासगाव शहरात १५ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जनता कर्फ्यूची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेचे प्रशासन सज्ज असून या पार्श्वभूमीवर छुपा व्यवसाय करणाऱ्यावर नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. जनता कर्फ्यूचे सकारात्मक परिणाम आणखी काही दिवसात दिसून येतील, तोपर्यंत नागरिकांनी घराबाहेर न पडता सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले.
तासगाव शहरातील नागरिकांना भाजीपाला आणि किराणा साहित्य याचा पुरवठा करण्यासाठी यंत्रणा तयार केली असून या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे प्रशासन कार्यरत असल्याची माहितीही मुख्याधिकारी पाटील यांनी यावेळी दिली.