महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रोडरोलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:19+5:302021-07-02T04:18:19+5:30

ओळी : महापालिका क्षेत्रातील पॅचवर्कसाठी अत्याधुनिक रोडरोलर दाखल झाले. त्याचे लोकार्पण महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. या वेळी ...

Two state-of-the-art roadrollers in the municipal fleet | महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रोडरोलर

महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रोडरोलर

Next

ओळी : महापालिका क्षेत्रातील पॅचवर्कसाठी अत्याधुनिक रोडरोलर दाखल झाले. त्याचे लोकार्पण महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. या वेळी नितीन कापडणीस, उत्तम साखळकर, संजय देसाई उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेने शहरातील खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेला सक्षम करण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पावले उचलली. बुधवारी महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रोडरोलर दाखल झाले. यामुळे पॅचवर्क यंत्रणा अधिक भक्कम झाली आहे. या रोलरचे पूजन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपयांची निविदा काढली जाते. पण, पॅचवर्कचे काम व्यवस्थित होत नसल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. त्यासाठी आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेच्या वतीनेच पॅचवर्कची कामे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदीलाही मंजुरी दिली. बुधवारी दोन अत्याधुनिक रोडरोलर दाखल झाले. या रोलरला व्हायब्रेट सिस्टीम आणि स्प्रिंकलर असल्याने रस्ता मजबुतीकरण योग्य रीतीने होणार आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले.

या वेळी आयुक्त कापडणीस, सभापती पांडुरंग कोरे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक विष्णू माने, संजय यमगर, प्रकाश मुळके, शेडजी मोहिते, फिरोज पठाण, मनगू सरगर, माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात, शहर अभियंता संजय देसाई, परमेश्वर अलकुंडे, वैभव वाघमारे, ऋतुराज यादव, कार्यशाळा प्रमुख तेजस शहा, सुधीर शहा, महेश आडमुठे, शैलेश भोसले, सोहेब मोमीन, परमेश्वर रनशूर आदी उपस्थित होते.

Web Title: Two state-of-the-art roadrollers in the municipal fleet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.