पांढरेवाडी बोर नदीपात्रात वाळू उपशाप्रकरणी दोन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:46+5:302021-05-21T04:27:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : पांढरेवाडी (ता.जत) येथे बोर नदीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन टॅक्टरचालकांना पकडून वाहने जप्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : पांढरेवाडी (ता.जत) येथे बोर नदीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन टॅक्टरचालकांना पकडून वाहने जप्त केली. महसुल विभागाने ही कारवाई गुरुवारी केली.
संखचे अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व त्यांच्या पथकाला गस्त घालताना पांढरेवाडी बोर नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करीत असताना लाल रंगाची व निळ्या रंगाचा बिना नंबरचा असे दोन दोन ट्रॅक्टर दिले. दोन्ही वाहने पथकाने अपर तहसील कार्यलयात आवारात लावण्यात आला आहे.
अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे तलाटी राजेश चाचे, गणेश पवार, शंकर बागेळी, विनायक बालटे, नितिन कुंभार, सचिन शिंदे, राहूल कोळी यांच्या पथकांनी कारवाई केली.
महसूल विभागाने कायमस्वरूपी कार्यवाही करून अवैध वाळू उपसा कायमचा बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
संबंधित ट्रॅक्टरमालकाना नोटीस दिली जाणार आहेत, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली.