दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक, अपघातात 1 ठार आणि 7 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 20:07 IST2022-01-23T17:49:36+5:302022-01-23T20:07:07+5:30
अपघातामुळे तासगाव-सांगली रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास ठप्प झाली होती.

दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक, अपघातात 1 ठार आणि 7 जण जखमी
कवठे एकंद: तासगाव-सांगली रस्त्यावर कवठेएकंदनजीक दोन चारचाकी गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली. वासुंबे फाट्यापासुन पुढे मांजर्डे (ता. तासगाव) येथील कुटुंब गाडी(क्र. एमएच 10 डीएल 9601) सांगलीहुन तासगावच्या दिशेने जात होते. तर दानोळी (ता. शिरोळ) येथील कुटुंब गाडी(क्र. एमएच 09 डीए 0304) सांगलीच्या दिशेने जात होते.
वरद कोल्ड स्टोअरेजनजीक दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांमधील आठजण जखमी झाले. सर्वांना तात्काळ आपलत्कालीन रुग्णवाहिकेतुन सांगलीतील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अद्याप मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.
अपघातामुळे तासगाव-सांगली रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजुस तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील व पथकाने धाव घेतली. ग्रामस्थ व युवकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.