सांगलीतून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:03+5:302021-06-06T04:21:03+5:30
सांगली : शहरातील मिरज रोडवरून २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी बबलू वसंत करांडे (रा. दत्तनगर, ...
सांगली : शहरातील मिरज रोडवरून २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी बबलू वसंत करांडे (रा. दत्तनगर, कर्नाळ) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ३० मे रोजी रात्रीच्या सुमारास हा चाेरीचा प्रकार घडला.
---
पावसाने पाणी रस्त्यावरच
सांगली : शहरात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्त्यावरच पाणी साचून राहत आहे. राममंदिर चौक, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याजवळ पाणी साचून राहत असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत.
----
लॉकडाऊन शिथिलतेनंतर सलून व्यावसायिकांना दिलासा
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने सोमवारपासून अनेक निर्बंध हटविण्यात येणार आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या सलून व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. लस घेतलेल्या व्यक्तीच्या सेवेस त्यांना परवानगी देण्यात आली आहे. उद्या, सोमवारपासून सलून व्यवसाय सुरू होणार आहे.
----
कोरोनासह मान्सून नियोजनात प्रशासन
सांगली : कोरोनाची दुसरी लाट अनुभवत असलेल्या जिल्ह्यातील प्रशासनाला आता कोरोनासह मान्सूनचेही नियोजन करावे लागत आहे. पावसाचा जोर वाढला तर संभाव्य पूरस्थितीच्या नियोजनासाठी प्रशासनाने या आठवड्यात बैठकांचा धडाका लावला आहे. कोरोनास्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने आता पूरपरिस्थिती येणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.
----