दुचाकी मॉडिफाय करणाऱ्यांची पोलिसांकडून कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:44+5:302020-12-27T04:20:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाढदिवसानिमित्त सांगलीवाडी येथे बेकायदा मॉडिफाय दुचाकींची आवाजाची स्पर्धा भरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाढदिवसानिमित्त सांगलीवाडी येथे बेकायदा मॉडिफाय दुचाकींची आवाजाची स्पर्धा भरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. या स्पर्धेविषयी व्हॉटस्अॅप ग्रुपवरून संदेश पाठविणाऱ्या व शुक्रवारच्या कारवाईवेळी पळून गेलेल्या दुचाकीस्वारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अजय सिंदकर यांनी तरुणांसह पालकांनाही यावेळी प्रबोधन केले.
विनापरवाना दुचाकीच्या आवाजांची स्पर्धा भरवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ वाहनांवर शुक्रवारी शहर पोलिसांनी कारवाई केली हाेती. यावेळी पळून गेलेल्या १९ जणांना शनिवारी बोलावून घेत त्यांना समज देण्यात आली. शिवाय या स्पर्धेविषयी व्हॉटसॲप संदेश पाठविणाऱ्यांनाही बोलावून घेण्यात आले होते. अशा ग्रुपवर सायबर पोलिसांकडून कडक पाहणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी उपअधीक्षक टिके यांनी सांगितले. या बैठकीला ३२ व्हॉटस्ॲप ग्रुपच्या ॲडमिनसह तरुणांचे पालकही उपस्थित हाेते.
----------------------------
फोटो २६ सिटी ०१ नावाने एडिटोरियल