सांगलीत लुटणाऱ्या दोघा तरुणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:53+5:302021-02-27T04:35:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील जुन्या बुधगाव रोडवर तरुणास लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील जुन्या बुधगाव रोडवर तरुणास लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. करण रामा पाटील (वय २१) व रोहित मधुकर गोसावी (२०, दोघेही रा. वाल्मिकी आवास, सांगली) अशी संशयितांची नावे असून त्यांच्याकडून २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्याचे व गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक शहरातील बायपास रोडवर असलेल्या पेट्रोल पंप परिसरात गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, रस्त्यात गाडी अडवून लुटणाऱ्या गुन्ह्यातील संशयित थांबले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी १९ फेब्रुवारीला एका तरुणाबराेबर भांडण झाल्यानंतर त्याच्याकडून पैसे व मोबाईल घेऊन पळून गेल्याचे पथकाला सांगितले. त्यानुसार शहर पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.