देवीला तेल घालण्यास जाताना जीपने ठोकरले; मिरजेचा युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:58 PM2024-10-04T12:58:50+5:302024-10-04T12:59:04+5:30

मिरज (जि.सांगली) : मिरजेतून कोल्हापूरला चालत देवीला जाणाऱ्या दोन तरुणांना जयसिंगपूरजवळ अज्ञात जीपने ठोकरल्याने प्रेम विजय गोसावी (वय १७, ...

Two youths who were walking from Miraj to Kolhapur to Devi were hit by an unknown jeep near Jaisingpur The youth was killed on the spot | देवीला तेल घालण्यास जाताना जीपने ठोकरले; मिरजेचा युवक ठार

देवीला तेल घालण्यास जाताना जीपने ठोकरले; मिरजेचा युवक ठार

मिरज (जि.सांगली) : मिरजेतूनकोल्हापूरला चालत देवीला जाणाऱ्या दोन तरुणांना जयसिंगपूरजवळ अज्ञात जीपने ठोकरल्याने प्रेम विजय गोसावी (वय १७, रा. गोसावी गल्ली, मिरज) हा युवक जागीच ठार झाला. तर, विजय बाबू गोसावी हा या अपघातात गंभीर जखमी झाला.

मिरजेतील गोसावी गल्लीतील प्रेम गोसावी व त्याचा शेजारी विजय गोसावी आणि दहा ते पंधरा तरुण शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोल्हापुरात अंबाबाईला तेल घालण्यासाठी गुरुवारी निघाले. तेथून ज्योत आणली जाणार होती. गुरुवारी रात्री मिरजेतून कोल्हापूरला पायी रवाना झाले.

प्रेम व विजय दोघेजण मागे व इतर साथीदार पुढे चालत होते. जयसिंगपूर बायपास रस्त्यावर जैनापूर येथे गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता अज्ञात जीपसारख्या वाहनाने दोघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात प्रेम गोसावी याचा जागीच मृत्यू झाला. तर, विजय गोसावी अपघातात गंभीर जखमी झाला.

Web Title: Two youths who were walking from Miraj to Kolhapur to Devi were hit by an unknown jeep near Jaisingpur The youth was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.