‘टाईप वन’ मधुमेह ठरतोय लहान मुलांसाठी घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:40+5:302021-07-23T04:17:40+5:30
सांगली : अनुवंशिकपणे असलेले आजार, शारीरिक बदल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने लहान मुलांमध्ये ‘टाईप वन’ प्रकारचा मधुमेह आढळून ...
सांगली : अनुवंशिकपणे असलेले आजार, शारीरिक बदल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने लहान मुलांमध्ये ‘टाईप वन’ प्रकारचा मधुमेह आढळून येत आहे. या मधुमेहाचे निदान झाल्यास त्या मुलास आयुष्यभर इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागत असल्याने मुलांसाठी याचे निदान घातक ठरत आहे. ‘ज्यूवेनाईल डायबिटीस’ म्हणूनही यास ओळखले जाते.
चौकट
काय आहेत लक्षणे
* मुलांना भरपूर तहान लागणे
* वारंवार लघवीला जाणे
* बेडमध्ये झोपेतच वारंवार लघवी करणे.
* भूक व्यवस्थित असतानाही मुलाचे वजन कमी होणे.
चौकट
आई-वडिलांना डायबिटीस असेल तर...
लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या डायबिटीसचे प्रमुख कारण म्हणजे अनुवंशिकता. आई-वडिलांना मधुमेह असेल तर तो कमी वयातच मुलांना होण्याची शक्यता बळावते. ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिनची तपासणी करून यावर उपचार सुरू करता येतात.
चाैकट
बालरोग तज्ज्ञ म्हणतात...
लहान मुलांमध्ये हा आजार आढळून आल्यास त्यास इन्सुलिनची आवश्यकता भासते. अशा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. शिशिर मिरगुंडे, बालरोग तज्ज्ञ
कोट
प्रामुख्याने आई-वडिलांकडूनच हा आजार मुलांमध्ये येतोत. अगदी जन्मलेल्या बाळामध्येही कधी कधी याची लक्षणे आढळून येतात. त्यामुळे याबाबत वेळेवर निदान व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास निर्माण झालेल्या तक्रारी कमी होऊ शकतात.
डॉ. उज्ज्वला गवळी, बालरोग तज्ज्ञ