"बांगलादेशाच्या विषयावरुन उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावं"; संभाजी भिडेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 04:05 PM2024-08-18T16:05:57+5:302024-08-18T16:11:51+5:30
आज सांगलीत संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी राज्यातील काही मुद्द्यावर भाष्य केले.
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणावरुन मोठा गोंधळ सुरू आहे, शेख हसीन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशही सोडला असून आता तिथे पुन्हा एकदा गोंधळ सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य केलं जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरुन राजकीयवर्तुळात चर्चा सुरू आहे. बांगला देशातील गोंधळावरुन आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केले आहेत. आज सांगलीत संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी राज्यातील काही मुद्द्यावरही भाष्य केले.
"मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...": अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?
"बांगलादेशात सुरु असल्याच्या निषेधार्त २५ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात बंद पाळण्यात येणार आहे. बांगलादेशातील गोंधळावर भारताने पाऊल उचलावीत आणि हा राडा थांबवावा. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांना याबाबत निवजेन देण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी भिडे यांनी दिली. यावेळी बोलताना भिडे यांनी यावरुन राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. "बांगलादेशातील सुरू असलेल्या अत्याचाराबाबत एकही राज्यकर्ते बोलत नाही हे वाईट आहे, या विषयावर उद्धव ठाकरे यांनीही बोलावे, ते या विषयावर बोलत नाहीत, असंही भिडे गुरुजी म्हणाले.
'मराठा आरक्षण कळीचा मुद्दा'
यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. भिडे म्हणाले, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आरक्षण कशाला पाहिजे तुम्ही सिंह आहात, देश चालवा आपले जंगल चालवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा जीवन गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात दररोज नवनवीन समस्यांची पालवी फुटत असते. त्यावर रामबाण उपाय करण्याचे काम शासन चांगलं पार पाडत आहेत, असंही संभाजी भिडे म्हणाले.
'महिलांच्या केसाला धक्का लागता कामा नये'
यावेळी संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरेख योजना आहे. यामध्ये फक्त मानधन नव्हे तर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे शासन पाहिजे, असंही भिडे म्हणाले.