Lok Sabha Election 2019 नतद्रष्ट शेतकरी नेत्याला घरी बसवा:उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:16 AM2019-04-12T00:16:18+5:302019-04-12T00:16:36+5:30

इस्लामपूर : शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाºया नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा, असा घणाघात शिवसेनेचे ...

Uddhav Thackeray should sit in front of senior farmer leader | Lok Sabha Election 2019 नतद्रष्ट शेतकरी नेत्याला घरी बसवा:उद्धव ठाकरे

Lok Sabha Election 2019 नतद्रष्ट शेतकरी नेत्याला घरी बसवा:उद्धव ठाकरे

Next

इस्लामपूर : शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाºया नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला. शिवसेना जे करते ते रोखठोक करते. गेल्या ४ ते ५ वर्षांत आमचे संबंध गोड, मधूर, कडू असले तरी, चांगल्या कामात कधी पाय आडवा घातला नाही. शेतकरी आणि जनतेसाठी शिवसेना-भाजपची युती ताकद पणाला लावणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृह मैदानावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी झालेल्या ‘विजय संकल्प सभेत’ ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, उमेदवार धैर्यशील माने, माजी खा. निवेदिता माने, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश हाळवणकर, आ. उल्हास पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. सत्यजित पाटील, आ. राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकºयांना पेन्शन देणारे हे पहिले
सरकार असेल. काश्मीर देशाचा अविभाज्य घटक असल्याने ३७० कलम काढणारच. देशद्रोह करणाºयाला फासावर लटकवणारच. सावरकरांसारख्या जाज्वल्य देशाभिमान बाळगणाºया देशभक्ताला डरपोक म्हणणारे राहुल गांधी लोकसभेतही पोहोचले नाही पाहिजेत. त्यांनी पंतप्रधान पदाचे स्वप्न बघण्याअगोदर देशाचा
इतिहास आणि वीरांचा त्याग समजून घ्यायला हवा.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप आता सेनेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. शेट्टींना पाडायला भाजप, सेना लागणार नाही. वसंतदादा, विखे-पाटील आणि मोहितेंना फसवणाºया पवारांसारख्या हुशार नेत्याच्या पिंजºयात शेट्टी फसले आहेत. धैर्यशील माने म्हणाले, माझी लढाई व्यक्तीविरुध्द नसून, प्रवृत्तीविरोधी आहे. प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावणाºया शेतकरी नेत्याचा त्याचवेळी निकाल लागला आहे.
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे संजय कोले, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वागत केले.
सभेचे संयोजक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नीता केळकर, माजी आ. भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, भीमराव माने, कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख मुरलीधर जाधव, सुरेश साळोखे, वैभव शिंदे, नितीन बानुगडे-पाटील, अरुण दुधवडकर, जयराज पाटील उपस्थित होते.

Web Title: Uddhav Thackeray should sit in front of senior farmer leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.