सांगलीतील पाचही जागा लढविणार : उद्धव ठाकरे

By admin | Published: July 14, 2014 12:38 AM2014-07-14T00:38:54+5:302014-07-14T00:39:35+5:30

पत्रकार परिषदेत माहिती

Uddhav Thackeray will contest five seats in Sangli | सांगलीतील पाचही जागा लढविणार : उद्धव ठाकरे

सांगलीतील पाचही जागा लढविणार : उद्धव ठाकरे

Next

इस्लामपूर : कोणीही उठावे आणि उमेदवार जाहीर करावे, असे होणार नाही. पक्षाच्या चौकटीतच त्यावर चर्चा होऊन योग्य तो निर्णय होईल. सांगली जिल्ह्यातील पाचही जागी शिवसेना उमेदवार देणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज, रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजपचे खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळसाठी अजितराव घोरपडेंची उमेदवारी भाजपतर्फे जाहीर केली आहे. यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
येत्या निवडणुकीत मनसेची अडचण होईल काय? या प्रश्नावर ते म्हणाले, आम्हाला कसली अडचण? त्यांची अडचण त्यांनाच विचारा.
भाजपला शिवसेनेकडून धोका आहे, अशी वक्तव्ये गृहमंत्री आर. आर. पाटील करीत आहेत. यावर ठाकरे म्हणाले की, हा त्यांच्या गृहखात्याचा तसा रिपोर्ट असेल. आघाडीचा संसार बिघडला आहे. त्यामुळे आमच्या युतीमध्ये काही बेबनाव होतो का? यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र, विचारांवर आधारित असलेली युती भक्कम आहे. युतीचे कार्यकर्ते निवडणुकीची वाट पहात आहेत. त्यामुळे महायुतीमधील सर्वच घटकांनी आपले पत्ते लवकर उघड करावेत. त्यामुळे निवडणुकीला एकदिलाने व ताकदीने सामोरे जाण्यास मदत होईल.
जागा वाटपाची प्रक्रिया आणि त्यासाठीची चर्चा लवकरच होईल. सेनेची उमेदवार यादी तयार आहे. वेळ येताच ती जाहीर करू. विधानसभेची निवडणूक स्वत: लढविणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले, अजून निवडणूक तर जाहीर होऊ द्या. (वार्ताहर)

Web Title: Uddhav Thackeray will contest five seats in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.