दुधगाव-खोची बंधाऱ्यावरून उजवड वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:24+5:302020-12-06T04:28:24+5:30

हा बंधारा धोकादायक झाल्याने येथून आवजड वाहतुकीसाठी बंदी केली आहे. वाहतुकीस प्रतिबंध म्हणून सुरक्षा कमानीही उभारण्यात आल्या होत्या. मात्र ...

Ujwad traffic blocked from Dudhgaon-Khochi embankment | दुधगाव-खोची बंधाऱ्यावरून उजवड वाहतूक रोखली

दुधगाव-खोची बंधाऱ्यावरून उजवड वाहतूक रोखली

Next

हा बंधारा धोकादायक झाल्याने येथून आवजड वाहतुकीसाठी बंदी केली आहे. वाहतुकीस प्रतिबंध म्हणून सुरक्षा कमानीही उभारण्यात आल्या होत्या. मात्र काही अज्ञातांनी या कमानीही पाडल्या आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावरून अवजड वाहनांची बिनधास्त वाहतूक करीत होते. सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने उसाने भरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली या धोकादायक बंधाऱ्यावरुन नेले जात होते. यामुळे बंधाऱ्यास अधिकच धोका होत होता. अनेकवेळा पाटबंधारे विभागाने दंड केला होता, तरीदेखील अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली नव्हती. म्हणून पाटबंधारे विभागाने दोन्ही बाजूला चरी काढून वाहतूक केली आहे.

चौकाट

पुलाचे काम कधी?

दुधगाव-खोची बंघाऱ्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे; परंतु तीन वर्षापासून नव्याने बांधल्या जाणाऱ्या पुलाचे काम अर्धवट आहे. ते लवकरत लवकर सुरू व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

फोटो-०५दुधगाव१

Web Title: Ujwad traffic blocked from Dudhgaon-Khochi embankment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.