कुणीकोणूर दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश, आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 09:03 PM2023-04-29T21:03:48+5:302023-04-29T21:11:11+5:30
ही घटना रविवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बेळंखी वस्तीवर घडली.
गजानन पाटील
दरीबडची : कुणीकोणुर (ता.जत) येथील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आले.हा खून भानामती, करणी,भावकीचा वाद या कारणाने हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियंका बिराप्पा बेंळुखे (वय-३२) व मुलगी मोहिनी बिराप्पा बेंळुखे (वय-१४) या मायलेकीचे नांव आहेत. या आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना रविवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बेळंखी वस्तीवर घडली.अक्षय रामदास बेळुंखे (वय २४),विकास मारुती बेळुंखे (वय २३), यांना अटक करण्यात आली. फरारी बबलू म्हळाप्पा बेळुंखे (वय २३) आहे.पोलिस शोध घेत आहेत.ही घटना रविवारी सायंकाळी रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली होती.
दुहेरी हत्याकांडाने खळबळ निर्माण झाली होती.कुणीकोणूर-सनमडी रस्त्यालगत बेळंखी वस्तीवर पति बिराप्पा कुटुंबासह रहातात.पत्नी प्रियंका,मुलगी मोहिनी,अन्य दोन मुले आहेत.बिराप्पाचे भावकीबरोबर वाद होता.पत्नी प्रियंका ही भानामती,चेटणी, करणी करते.त्यामुळे अक्षयाचा मोठा भाऊ भावकीतील माजी सैनिक विजयकुमार बेळुंखे यांचा एका महिन्यापूर्वी निधन झाले होते.आरोपी अक्षय यांचा मोठ्या भाऊ माजी सैनिक विजयकुमार बेळुंखे यांचा एका महिन्यापूर्वी निधन झाले होते.त्याबरोबर त्यांचे पूर्ववैमनस्य होते.
रविवारी सायंकाळी पाच वाजता घरी कोणीही नव्हते.अक्षय बेळुंखे ,विकास बेळुंखे बबलू बेळुंखे हे घरी गेले. प्रियंकाला पाणी मागितले. पाणी आणायला आत गेल्यावर दोघांनी तिला दोघांनी पकडले.तिस-यांनी गळा दाबून खून केला.मुलगी मोहिनी ही पाणी आणायला गेली.तिने आईचा मृतदेह आरोपी आईचा मृतदेह छप्परात टाकताना मोहिनीने बघतिला.ती आरडोआरडो करु लागली.घटना पाहिल्यामुळे तिची बाहेर वाचता करेल. या भितीने मुलगी मोहिनी हिचा गळा आवळून तिचा खून केला.तेथून ते विकास,बबलू फरार झाला. सांगोल्याला दुचाकी गाडीवरुन गेले.सांगोल्यातून रेल्वेने दिल्र्लीला गेले. संशयित म्हणून अक्षयला ताब्यात घेतले होते.परंतु गुन्हा कबूल न केल्यामुळे सोडले होते. आज सकाळी विकास सापढल्याने गुन्हा उघडकीस आला.पोलिस फरार बबलू याचा शोध घेत आहेत.
पति पत्नी वारंवार खटके उडत होते.हा खून त्याच्याव येईल.यामुळे खून करुन आरोपी करुन फरारी झाला ही घटना संशयास्पद असल्याने रात्री १० वाजता माहिती पोलीस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलीस ठाण्याला दिली.फिर्यादी मयतचा भाऊ संतोष रामा चौगुले (वय १९,रा खैराव ता.जत) यांनी दिली आहे.त्यानुसार बिराप्पा बेळुंखेला अटक केली होती.तात्काळ उमदी पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी मयतचा भाऊ संतोष रामा चौगुले (वय १९,रा खैराव ता.जत) यांनी दिली आहे.त्यानुसार बिराप्पा बेळुंखेला अटक केली होती. मुलगी मोहिनी ही गावातील हुडेबाबा हायस्कूलमध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत आहे. बिराप्पाचे लग्नानंतर सुखात संसार सुरु होता.पत्नी प्रियंका,मुलगी मोहिनी हिचा खून झाला.या दुहेरी खूनामुळे तीन कुटुंब उध्वस्त झाले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस फौजदार महेश स्वामी यांना गुप्त माहिती मिळाल्याने.सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,पोलीस उपनिरीक्षक एस एस शिंदे,हवालदार संजयकुमार माळी,महेश स्वामी,पोलीस हवालदार आटपाडकर,पोलीस सिध्देश्वर हवालदार नितीन पलूस्कर,पोलीस हवालदार प्रकाश रामागडे,पोलीस शिपाई आप्पा कुंभारे यांनी सापळा रचून दोघांना अटक केले आहे.