बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 11:53 AM2023-05-03T11:53:35+5:302023-05-03T11:53:52+5:30

बुडालेल्या सौदर्या हिला डुबकी घेऊन चुलते मनोज शेसवरे यांनी बाहेर काढले. विहिरीच्या पायरीवरुन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले.

Uncle and nephew who went to rescue nephew who fell in well drowned, incident in Sangli | बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना

बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना

googlenewsNext

शिरढोण : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचवण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतणीचा बुडून मृत्यू झाला. मनोज भास्कर शेसवरे (वय ४३) आणि सौंदर्या वैभव शेसवरे (१६, दोघेही रा. अग्रण धुळगाव) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात घटनेची नाेंद आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या व तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी मायलेकी दोघीही विहिरीत उतरल्या होत्या. विहिरीत उतरलेल्या सौंदर्या हिने कळशीत पाणी भरले व वरती येत असतानाच तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. काही समजण्याच्या आतच ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा केला.

तेवढ्यात सौंदर्याचा चुलते असलेले मनोज शेसवरे हे धावत आले आणि विहिरीमध्ये सौंदर्याला वाचवण्यासाठी उडी मारली. मनोज हे पाण्यामध्ये आल्यावर गटांगळ्या घेत असलेली सौंदर्या हिने मनोज यांना पाण्यामध्ये पटकन मिठी मारली. सौंदर्याने ही घट्ट मिठी मारल्याने मनोज शेसवरे यांना हातपाय हलवता आले नाही. त्यामुळे त्यांना पोहता आले नाही. यामुळे दोघेही विहिरीत बुडाले. 

सौंदर्याच्या आईने परत आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ आले, पण उशीर झाल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय येथे या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

पाण्यातून बाहेर काढले, पण पुन्हा पाय घसरला

बुडालेल्या सौदर्या हिला डुबकी घेऊन चुलते मनोज शेसवरे यांनी बाहेर काढले. विहिरीच्या पायरीवरुन सौदर्याला उचलून मिठीत घेऊन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौदर्याने अगदी घट्ट मारलेली मिठी आणि थकव्यामुळे मनोज यांना अखेर श्वास सोडावा लागला. मनोज हे भारतीय सैन्यात होते. काही वर्षापूर्वीच ते निवृत्त झाले होते.

Web Title: Uncle and nephew who went to rescue nephew who fell in well drowned, incident in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.