भाजपचा निवडणुकीसाठी गैरसोयीचा अजेंडा-- हारुण शिकलगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:25 AM2017-09-17T00:25:19+5:302017-09-17T00:26:50+5:30
सांगली : महापालिकेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपने तिन्ही शहरात गैरसोयींचा अजेंडा आखला आहे. महापालिका क्षेत्रात विकासकामे ठप्प कशी होतील,
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपने तिन्ही शहरात गैरसोयींचा अजेंडा आखला आहे. महापालिका क्षेत्रात विकासकामे ठप्प कशी होतील, याची दक्षता भाजपचे लोक घेत आहेत, अशी टीका महापौर हारुण शिकलगार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी सांगलीत आल्यानंतर महापालिका पदाधिकारी भेटण्यास येत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. ही त्यांची निव्वळ स्टंटबाजी आहे. वास्तविक शासनाच्या इशाºयानेच महापालिकेत विकासाचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अडवणुकीचा उद्योग सुरू आहे. आयुक्तांमार्फत विकासकामांच्या फायली अडविल्या जातात. महापालिकेने स्वनिधीतून मंजूर केलेली २४ कोटी रुपयांची विकासकामे गेल्या वर्षभरात अडली आहेत. शहराला खड्ड्यांमध्ये लोटून महापालिकेत काँग्रेसला बदनाम करण्याचे षङ्यंत्रच सुरू आहे.
स्वच्छता अभियान हा काही भाजपने लावलेला शोध नाही. संत गाडगेबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी आदींनी हा स्वच्छतेचा दिलेला कानमंत्र अनेक वर्षे अभियान म्हणून राबविला जात आहे. सरकार कोणाचेही असो, २ आॅक्टोबरला अभियान राबविले जातेच. असे असताना केवळ चमकोगिरीसाठी या अभियानाचा बोलबाला सुरू केला आहे. त्यांनी आम्हाला डालवून हा कार्यक्रम केला. हे राजकारण कोणाच्या इशाºयाने सुरू आहे. महापालिकेचा कारभार आता मुंबईतूनच सुरू झाला आहे. स्वच्छ असलेल्याच कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विश्रामबाग रस्त्यावर पालकमंत्री व आयुक्तांनी सफाईचा स्टंट केला. चार दिवस शामरावनगरातील लोक दलदल, पाण्यात अडकले आहेत, ते दिसले नाही का? ते शामरावनगरात गेले असते, तेथे सफाई केली असती तर, खºयाअर्थाने जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले असते, असा टोला त्यांनी लगावला.
अमृत योजनेची निविदा स्थायी समिती अस्तित्वात नसताना मान्य करण्यात आली. त्यामुळे टेंडरचे अधिकार महासभेचे होते. असे असूनही आयुक्तांच्या पुढाकाराने शासनाने परस्पर मुंबईत टेंडर कशासाठी काढले? शहरात ड्रेनेज, पाणी योजनेसह विविध कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डयांत शहर अडकले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे व्हावीत, अशी भावना होती.
ती कामेही प्रशासनाने केली नाहीत. गेल्या महासभेत २८ आॅगस्टरोजी सर्व नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांवर आगपाखड केली होती. त्यानंतर आठ दिवसांत वर्कआॅर्डर काढून कामे सुरू होतील, असे आयुक्तांनी सांगितले. पण आज २५ दिवस उलटूनही वर्कआॅर्डर नाहीत.
अनेक प्रश्न प्रलंबित
कुपवाडच्या ड्रेनेज योजनेसंदर्भात मलनिस्सारण केंद्रासाठी जागा निश्चितीसह सर्वच कामांसाठी महासभेने आयुक्तांना वर्षभरापूर्वी प्राधिकृत केले आहे. परंतु हे प्रश्नही प्रशासनाने अद्याप मार्गी लावलेले नाहीत. नगरसेवक, पक्षात भांडणे लावून अधिकाºयांकडून भाजपची पेरणी सुरू आहे. एकूणच आयुक्तांचा कारभार शासनाच्या इशाºयाने मुंबईतूनच चालत आहे, अशी टीका शिकलगार यांनी यावेळी केली.