‘बेशिस्त’ वाहनधारकांवर सांगलीत ‘सीसीटीव्ही’ची नजर! ‘ई-चलन’ची मदत-नोटीस घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:35 PM2018-05-07T22:35:21+5:302018-05-07T22:35:21+5:30

'Unconscious' Citizens' CCTV Watch! 'E-currency' help-home | ‘बेशिस्त’ वाहनधारकांवर सांगलीत ‘सीसीटीव्ही’ची नजर! ‘ई-चलन’ची मदत-नोटीस घरी

‘बेशिस्त’ वाहनधारकांवर सांगलीत ‘सीसीटीव्ही’ची नजर! ‘ई-चलन’ची मदत-नोटीस घरी

Next
ठळक मुद्दे नियम तोडाल, तर कारवाईची नोटीस घरी पोहोचणार

सचिन लाड
सांगली : वाहतूक पोलीस रस्त्यावर असोत अथवा नसोत...सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरात बेशिस्त वाहनधारकांवर २४ तास अत्याधुनिक ‘सीसी टीव्ही’ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सीसीटीव्हीचे फुटेज तपासून बेशिस्त वाहनधारकांना शोधून काढले जाणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र ‘टीम’तैनात केली आहे. ‘ई-चलन’ची मदत घेऊन बेशिस्त वाहनधारकांना दंडात्मक कारवाईची नोटीस घरी पोहोच केली जाणार आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.
ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, सीटबेल्ट न घालणे, नियमबाह्य नंबर प्लेट, कर्णकर्कश हॉर्न, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, लायसन्स नसणे, हेल्मेट न घालणे यासह इतर वाहतूक नियम वाहनधारकांकडून मोडले जातात. वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर दंड भरण्यास टाळाटाळ केली जाते. आपण नियम तोडलाच नाही, असे ठणकावून सांगतात. अनेकजण राजकीय नेत्यांचे ‘वजन’ वापरून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. याला आळा घालण्यासाठी गतवर्षी जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी वाहतूक शाखेत ‘ई-चलन’प्रणाली सुरूकेली. या माध्यमातून वाहतूक नियम तोडणाºया वाहनधारकांचे फोटो वाहतूक पोलीस मोबाईलवर घेतात. फोटो घेतल्यानंतर वाहनाच्या क्रमांकावरून मालकाचे नाव व पत्ता समजतो. तसे सॉफ्टवेअर प्रत्येक पोलिसाच्या मोबाईलवर घेण्यात आले आहे. वाहनधारकाचे नाव, पत्ता समजल्यानंतर त्याला घरी नोटीस पाठवून सात दिवसांत वाहतूक शाखेत दंड भरावा, अन्यथा न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असे सांगितले जाते.
मोबाईलवर घेतलेल्या फोटोमध्ये संबंधित वाहनधारकाचे वाहन, त्याने कोणत्या प्रकारचा नियम तोडला आहे, याचे चित्रण, वेळ, ठिकाण येत आहे. या सर्व बाबींचा उल्लेख नोटिशीत असतो. त्यामुळे वाहनधारकांना खोटे बोलण्याची संधी मिळत नाही. दंड किती भरावा लागेल, यापेक्षा आपण चुकलो असतानाही पोलिसांशी वाद घातला, हे घरी नोटीस आल्यानंतर वाहनधारकांना समजत आहे. दुपारच्यावेळी तसेच रात्री आठनंतर वाहतूक पोलीस रस्त्यावर नसतात. त्यावेळीही वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. आवठड्यापूर्वी सांगली, मिरज व कुपवाड शहरात ७८ अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेºयांची मदत घेऊन दररोजच्या फुटेजची तपासणी करून बेशिस्त वाहनधारकांची यादी बनविली जात आहे.
चौकट...
छायाचित्रणासह नोटीस
सीसी टीव्ही कॅमेरे ‘ई-चलन’ प्रणालीला कनेक्ट करण्यात आले आहेत. बेशिस्त वाहनधारकांना फुटेजमधून शोधून काढल्यानंतर ई -चलनच्या माध्यमातून वाहनधारकाचे नाव मिळणार आहे. तसेच संबंधित वाहनधारकाने कोणत्या प्रकारचा आणि कुठे नियम तोडला, याचे छायाचित्रण व वेळ मिळणार आहे. त्यानंतर वाहनधारकाला त्याने नियम तोडलेली दंडात्मक कारवाईची नोटीस छायाचित्रणासह घरी पाठविली जाणार आहे. ई-चलनबरोबर आता सीसी टीव्हीच्या मदतीनेही बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई होणार आहे.
चौकट...
पाच लाखांचा दंड
ई-चलन प्रणाली सुरू केल्यापासून वाहतूक पोलिसांनी अडीच हजार बेशिस्त वाहनधारकांना दंडात्मक कारवाईची नोटीस घरी पाठविली आहे. यातून पाच लाखांचा दंड वसूल केला आहे. आता सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही सोमवारपासून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई सुरू केली आहे.
- अतुल निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.

Web Title: 'Unconscious' Citizens' CCTV Watch! 'E-currency' help-home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.