वेळीच आई समजून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:07+5:302021-01-17T04:23:07+5:30
कोकरूड : प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहून नेटाने उभी करणारी आई समाजाचे आणि एकून जीवनाचे प्रतिबिंब होते. म्हणून माणूस घडविण्याचे ...
कोकरूड : प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहून नेटाने उभी करणारी आई समाजाचे आणि एकून जीवनाचे प्रतिबिंब होते. म्हणून माणूस घडविण्याचे खरे काम वडिलांपेक्षा आईच करत असते. त्यामुळे देशातील अनेक माणसे पुढे येऊन मोठी झाली. यामुळे वेळीच आई समजून घ्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.
कोकरूड (ता. शिराळा) येथे कोकरूड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे आयोजित शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना 'आई समजून घेताना' या विषयावर ते बोलत होत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख अध्यक्षस्थानी होते. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, तामिळनाडू सरकारचे सचिव आनंद पाटील, इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते, कवी प्रदीप पाटील, वसंत पाटील, फत्तेसिंगराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, माजी सभापती बाळासाहेब पाटील, हणमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कांबळे म्हणाले, शिवाजीराव देशमुख यासारखे मातीतून उगवलेले नेतृत्व या राज्याला लाभले. साहेबांसारखा भूमिपुत्र नेता या गावाला मिळाल्याने गावाचे नाव जगाच्या नकाशावर आले. आज पुरुषप्रधान व्यवस्थेत महिलांना किंमत नाही. मात्र जात, धर्म, बंध यांची सीमा संपते तिथे आई असते. आईच्या प्रेमाला, सीमांना अंत नसताे. ती आपल्या कुटुंबाच्या सुखात स्वतःचे सुख मानत असते. आई मुलासाठी काहीही करण्यास तयार होते. मात्र ती कुणाला कळत नाही.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवाजीराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ए. सी. पाटील यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी करून दिला. संजय घोडे यांनी आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा नांगरे, उपसभापती बी. के. नायकवडी, विकास नांगरे, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच पोपट पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सुहास घोडे, अंकुश नांगरे, माजी सरपंच सुनील घोडे, मोहन पाटील, माजी उपसरपंच नंदकुमार पाटील, के. वाय. भाष्टे, तानाजी घोडे आदी उपस्थित होते.
यावेळी नारायण नांगरे (आबा) फाउंडेशनच्यावतीने मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे यांनी आपल्या दोन महिन्यांच्या वेतनातून सात होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजारांची मदत केली. देवश्री नांगरे हिने तिला मिळालेली दहा हजार शिष्यवृत्ती आबा फाउंडेशनला दिली.
फाेटाे : येणार आहे.