वाहतूक संघटनेकडून स्मशानभूमीत स्वच्छता, येलूर येथे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 04:57 PM2019-02-07T16:57:56+5:302019-02-07T17:03:33+5:30

येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभत आहे.

Undertaking in the Cemetery Cleanliness, Yelur, from Transport Organization | वाहतूक संघटनेकडून स्मशानभूमीत स्वच्छता, येलूर येथे उपक्रम

वाहतूक संघटनेकडून स्मशानभूमीत स्वच्छता, येलूर येथे उपक्रम

Next
ठळक मुद्देवाहतूक संघटनेकडून स्मशानभूमीत स्वच्छता, येलूर येथे उपक्रमबाजारपेठेतही मोहिम; सामाजिक उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचेही सहकार्य

संजय येंगटे 

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभत आहे.

गावातील टेंपो व गाड्या भाड्याने देणारे मालक-चालक हे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दर बुधवारी गावातील मुख्य बाजारपेठ व स्मशानभूमीची स्वच्छता करीत आहेत. याकरिता ग्रामपंचायतीकडून त्यांना झाडू देण्यात आले आहेत. मुख्य बाजारपेठेत अनेक व्यावसायिक, दुकानदार, बँक, दूध संस्था, सहकारी सेवा सोसायटी असल्याने तेथे नेहमी लोकांची गर्दी असते.

याच ठिकाणी दर शनिवारी मोठा बाजार भरतो. त्यामुळे येथे कचरा पडलेला असतो. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होऊ नये, म्हणून दर शनिवारी रात्री ग्रामपंचायतीच्यावतीने बाजारपेठेची स्वच्छता केली जाते व बुधवारी वाहतूक संघटनेच्यावतीने याच ठिकाणची स्वच्छता केली जात आहे. तसेच स्मशानभूमीचीही स्वच्छता या संघटनेच्या माध्यमातून केली जाते.

या त्यांच्या उपक्रमाचे ग्रामस्थांतून स्वागत होत आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ एक सामाजिक उपक्रम म्हणून ते हे स्वच्छता अभियान राबवित आहेत. या उपक्रमात संदीप गायकवाड, संताजी थोरात, सागर गायकवाड, बाबासाहेब कुंभार, महेश पाटील, कपिल चव्हाण, जयदीप पाटील, तानाजी पाटील, सचिन आडके यांनी सहभाग घेतला आहे. शिवाजीनगर भागातील भैरवनाथ मंदिर परिसरात येथील नितीन पाटील हे स्वखर्चाने रस्त्यालगत व पडीक जागेत वाढलेल्या तणावर तणनाशक फवारतात.

Web Title: Undertaking in the Cemetery Cleanliness, Yelur, from Transport Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.