बुधगावातील बेवारस वृध्दाला मिळाली ‘सावली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:59+5:302021-01-23T04:27:59+5:30
येथील नाका भागात मागीत दहा वर्षांपासून एका घराच्या ओसरीवर राहणारे कलावंत मूळचे जमखंडीचे. चाळीस वर्षे त्यांनी बुधगावातील एका सिमेंट ...
येथील नाका भागात मागीत दहा वर्षांपासून एका घराच्या ओसरीवर राहणारे कलावंत मूळचे जमखंडीचे. चाळीस वर्षे त्यांनी बुधगावातील एका सिमेंट पाईप कारखान्यात काम केले. पूर्वीपासूनच ते बुधगावात भाड्याच्या खोलीत राहत. ते स्वत: स्वयंपाक बनवून खात. त्यांंना पत्नी, एक विवाहित मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. मात्र ते त्यांना सांभाळत नसल्याने, त्यांच्यावर बेवारसी जीवन जगण्याची वेळ आली. पाईप कारखान्यातील काम बंद झाल्यानंतर त्यांचे हाल होऊ लागले. माणुसकीच्या भावनेतून शेजारचे अनिल पाटील, बंडू भगत यांनी कलावंतांच्या खाण्याची व्यवस्था केली. मात्र अलीकडे त्यांची तब्येत खालावली होती.
जिव्हाळा फौंडेशनच्या प्रशांत मुळिक, किरण कांबळे, दशरथ पाटील यांना ही माहिती मिळाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, त्यांना सांगलीच्या सावली निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. याकामी डॉ. वसिम चौगुले यांनी आरोग्य तपासणी केली. सांगलीचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपनिरीक्षक सागर पााटील, माजी सरपंच गणेश पाटील, बाळासाहेब सन्मुख यांची मदत झाली. निवारा केंद्रात मुस्तफा मुजावर यांनी कलावंत यांचे स्वागत केले.
फोटो-२२बुधगाव१
फोटो ओळ :
बुधगाव (ता. मिरज) येथील फक्रुद्दीन जैदू कलावंत यांना जिव्हाळा फौंडेशनच्या सदस्यांनी सांगलीच्या ‘सावली’ निवारा केंद्रात दाखल केले.