गदिमांच्या स्मारकासाठी साहित्याचा अखंड जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:32+5:302020-12-15T04:42:32+5:30
गदिमांच्या स्मारकासाठी जिल्हाभरातील साहित्यिकांनी सांगलीत एकत्र येत साहित्यजागर केला. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठी त्यांच्याच ...
गदिमांच्या स्मारकासाठी जिल्हाभरातील साहित्यिकांनी सांगलीत एकत्र येत साहित्यजागर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठी त्यांच्याच साहित्याचा जागर करत शासनाला स्मरण करून देणारे अभिनव आंदोलन साहित्यिकांनी सोमवारी केले. पुण्यासह माडगुळे व शेटफळे येथे स्मारकाला गती मिळावी यासाठी दिवसभर साहित्यजागर केला. साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आवाज उठविला. प्रा. वैजनाथ महाजन, डाॅ. अनिल मडके, शिवराज काटकर यांनी स्मारकांच्या कामाला गती देण्याची मागणी केली.
या अभिनव आंदोलनात प्रमोद चौगुले, प्रा. एम. एस. राजपूत, नामदेव माळी, संजय पाटील, डाॅ. स्वाती शिंदे-पवार, प्रकाश बिरजे, तानाजी बोराडे, नीलम माणगावे, प्रा. उज्ज्वला केळकर, प्राचार्य डी. जी. कणसे, चंद्रकांत देशमुखे, हरिभाऊ कुलकर्णी, राजेंद्र पोळ, नंदू गुरव आदींनी सहभाग नोंदविला. गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या पुढाकाराने राज्यभरात ठिकठिकाणी सोमवारी एकाच दिवशी कविता वाचनाद्वारे जनआंदोलने झाली.
प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी जनआंदोलनाची पार्श्वभूमी विशद केली. अर्चना मुळे, डाॅ. दीपाली वाळवेकर, ज्योती पाटील, डाॅ. प्रांजली माळी, अस्मिता इनामदार, सारिका मुळ्ये यांनी काव्यवाचन केले. त्यानंतर साहित्यिकांनी गदिमांच्या कविता, गाण्यांचा अभिषेक घातला.
प्रा. धनदत्त बोरगावे, बाबा परीट, प्रा. संतोष काळे, सुहास पंडित, प्रा. अनिलकुमार पाटील, प्रा. निर्मला लोंढे, महेश कोष्टी, निलांबरी शिर्के, संपत कदम, बजरंग आंबी, प्रतिभा जगदाळे, सुनीता बोर्डे, प्रा. संजय ठिगळे, सदानंद माळी, अश्विनी कुलकर्णी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, शाहीर चंद्रकांत गायकवाड, रघुराज मेटकरी, मुबारक उमराणी, भीमराव कांबळे, नितीन माळी, विनायक कदम, दत्तात्रय सपकाळ, नाना हलवाई, रणजित मगदूम, मारुती नवलाई, प्रकाश कुलकर्णी, श्रीशैल्य चौगुले, योगेश मेटकरी आदींनी कविता, बालगीते, चित्रपटगीते, लावणी आदी साहित्यप्रकार सादर केले.
यावेळी संयोजक महेश कराडकर म्हणाले, आंदोलनाच्या निमित्ताने साहित्यिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. भविष्यातही एकजूट कायम राखत विधायक उपक्रम राबविण्यात येतील.
नामदेव भोसले, अभिजित पाटील, दयासागर बन्ने, गौतम कांबळे, वर्षा चौगुले आदींनी संयोजन केले.
चौकट
लेखनाचे दालन उभारणार
जिल्ह्यातील लेखक, कवी यांच्या विविध विषयांवरील लेखांच्या प्रतींचे दालन यशवंतराव चव्हाण ग्रंथालयात उभारण्यात येणार आहे, या उपक्रमालाही प्रतिसाद मिळाला. पुण्यात गदिमा यांच्या स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याच्या तेथील महापौरांच्या घोषणेचे आंदोलनात स्वागत करण्यात आले.
--------------