नवीन वाहन कायद्यानुसार रिक्षाच्या वाढीव परवाना शुल्काला संघटनांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:47+5:302021-03-27T04:27:47+5:30
सांगलीत रिक्षा संघटनांतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांना निवेदन देण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नव्या केंद्रीय ...
सांगलीत रिक्षा संघटनांतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नव्या केंद्रीय वाहन कायद्यानुसार रिक्षाच्या नोंदणी शुल्कात वाढ व फिटनेस विलंबास दंडाच्या तरतुदीला रिक्षा संघटनांनी हरकती नोंदविल्या आहेत. प्रवासी वाहतूक ॲपे रिक्षा संघटनेतर्फे सांगलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेने नोंदविलेल्या हरकती अशा : ऑटो रिक्षाच्या नोंदणी शुल्कात व इतर शुल्कात अजिबात वाढ करू नये. रिक्षा फिटनेस व नूतनीकरणासाठी अल्प शुल्क आकारावे. फिटनेस विलंब झाल्यास दररोज ५० रुपये अतिरिक्त दंड आकारणी करू नये. रिक्षाच्या थर्ड पार्टी विम्याचे दर त्याचे कार्यक्षेत्र, आसन क्षमता, वेग व अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन निश्चित करावे. किमान १५०० ते २००० इतकाच प्रीमियम ठेवावा. रिक्षाचे नोंदणी शुल्क १००० रुपये, तर परवाना नूतनीकरण शुल्क ५०० रुपये ठेवावे. फिटनेस शुल्क ६०० रुपये ठेवावे.
निवेदन देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी महेश चौगुले, राजू रसाळ, रफिक खतीब, प्रकाश चव्हाण, मोहसीन पठाण, आरिफ शेख, प्रदीप खराडे, बाबासाहेब चव्हाण, महेश सातवेकर, बंडू तोडकर आदी उपस्थित होते.