Holi: मिरजेत महिलांनी पुरुषांना काठीने बदडलं, गोसावी समाजाची अनोखी होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 02:26 PM2022-03-21T14:26:08+5:302022-03-21T14:26:48+5:30

पुरुषांना काठीने बदडून काढण्याची शेकडो वर्षाची होळीची ही गोसावी समाजाची प्रथा मिरजेत अद्याप सुरू आहे.

Unique Holi tradition of Miraj Gosavi community | Holi: मिरजेत महिलांनी पुरुषांना काठीने बदडलं, गोसावी समाजाची अनोखी होळी

Holi: मिरजेत महिलांनी पुरुषांना काठीने बदडलं, गोसावी समाजाची अनोखी होळी

googlenewsNext

मिरज : मिरजेत होळीच्या सणानिमित्त गोसावी समाजात महिला पुरुषांना काठीने मारण्याची प्रथा आहे. होळीनिमित्त गोसावी समाजाचा काठीचा खेळ उत्साहात पार पडला.

मिरजेत होळीनिमित्त महिला पुरुषांना काठीने बदडून काढण्याची शेकडो वर्षाची होळीची ही गोसावी समाजाची प्रथा मिरजेत अद्याप सुरू आहे. महाराष्ट्रात गोसावी समाज मोलमजुरी भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. धार्मिक व रुढी परंपरावादी असल्याने गोसावी बांधव अनेक सण धार्मिक पद्धतीने साजरे करतात, मिरजेतील उत्तमनगर परिसरात गोसावी समाजातर्फे दरवर्षी उत्साहात होळी सण साजरा करण्यात येतो.

होळीच्या तिसऱ्या दिवशी काठीचा खेळ खेळण्यात येतो. होळी पेटविलेल्या ठिकाणी महिला झेंडा घेऊन उभे राहतात. पुरुष हा झेंडा पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. झेंडा पळवून नेणाऱ्या पुरुषांना महिला काठीने बदडतात. होळीनिमित्त शेकडो वर्षांची ही झेंड्याच्या खेळाची परंपरा गोसावी समाजबांधवांनी टिकविली आहे.

दोन वर्षाचा खंड..

गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा जण साजरा करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाची लाट ओसरली असून प्रशासनाने निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे गोसावी समाजाने त्यांचा पारंपारिक होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात केला.

Web Title: Unique Holi tradition of Miraj Gosavi community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.