सांगलीत परीट समाजातर्फे कपडे धुण्याचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:15 PM2018-12-17T15:15:03+5:302018-12-17T15:16:29+5:30

परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी सोमवारी सांगलीत परीट समाज सेवा संघाच्या वतीने कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Unique movement of washing clothes by Sangliat Parit Samaj | सांगलीत परीट समाजातर्फे कपडे धुण्याचे अनोखे आंदोलन

सांगलीत परीट समाजातर्फे कपडे धुण्याचे अनोखे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत परीट समाजातर्फे कपडे धुण्याचे अनोखे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी

सांगली : परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी सोमवारी सांगलीत परीट समाज सेवा संघाच्या वतीने कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डॉक्टर बांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशीसह केंद्र सरकारला पाठवावा, संत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, संत गाडगेबाबा यांचा 23 फेब्रुवारी हा जन्मदिवस स्वच्छता दिन म्हणून साजरा करावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Unique movement of washing clothes by Sangliat Parit Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.