वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:52 AM2018-05-03T00:52:02+5:302018-05-03T00:52:02+5:30

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे

Unity Movement for Varna Scheme: The announcement of city President Alka Swamy | वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा

वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा

Next
ठळक मुद्देएकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे. मात्र, साडेतीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतूनच पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एकजुटीने आंदोलन केले जाईल. त्याला सर्व पक्ष, आघाड्या, संघटना, आदींसह नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी केले.
अमृत शहर योजनेतून अनुदान मिळालेल्या वारणा नळ पाणी योजनेला दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा बचाव कृती समितीचा जोरदार विरोध होत आहे. मात्र, इचलकरंजीवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गैरसमजुतीतून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी बुधवारी नगरपालिका सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत नगराध्यक्षा स्वामी बोलत होत्या. बैठकीच्या सुरुवातीला शीतल पाटील यांनी स्वागत व भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात पोवार यांनी बैठकीचा उद्देश व्यक्त केला.
नगरपालिकेकडील पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विजय जगताप म्हणाले, सन १९८६ पासून इचलकरंजी शहराकरिता वारणा धरणामध्ये एक टीएमसी पाणी आरक्षित आहे. मात्र, आंदोलकांनी कोणतीही तांत्रिक माहिती न घेता निव्वळ आंधळेपणाने विरोध सुरू केला आहे. शामराव कुलकर्णी म्हणाले, वारणा नदीतून पिण्याचे पाणी मिळणे, हा हक्क आहे. सर्वांनी एकजुटीने आंदोलन उभारले पाहिजे.
अ‍ॅड. जवाहरलाल छाबडा म्हणाले, वारणा नळ योजनेला होणारा विरोध राजकीय आहे. वारणा नळ योजनेबाबत झालेला गैरसमज दूर करण्यासाठी शासनाने माजी न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती नेमावी. अहमद मुजावर म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडूनच दानोळी येथील वारणा योजना मंजूर केली आहे. योजनेची जबाबदारी घेऊन प्रशासनाने ती पूर्ण करावी.
जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले, इचलकरंजीकरांना पाणी दिल्यास वारणाकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते, आदींनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. अशोक स्वामी म्हणाले, इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आता वारणा नदीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निव्वळ गैरसमज निर्माण करून पिण्याचे पाणी थांबविता येणार नाही. ततत्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून पाणी मिळण्याकरिता आंदोलन हाती घेण्यात यावे.
बैठकीत विठ्ठल चोपडे, अजित जाधव, प्रकाश मोरबाळे, अशोक जांभळे, विनायक कलढोणे, अभिजित पटवा, राजन मुठाणे, बजरंग लोणारी, शिवाजी साळुंखे, बाबा नलगे, नितीन लायकर, मिश्रीलाल जाजू, गजानन महाजन, राहुल खंजिरे, नितीन कोकणे, आदींनी आपले विचार मांडले.

वारणा धरण प्रकल्पामुळे नदीत मुबलक पाणी
वारणा धरण प्रकल्पात नेहमीच ३४.५ टीएमसी पाणी साठविले जाते. त्यापैकी ७.५ टीएमसी पाणी विनावापर पडून राहते. सन २०१६ मध्ये मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे नदीकाठावरील गावांसाठी पाणी उपसा बंद करण्यात आला होता, असे सांगून नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले, हा अपवाद वगळता गेल्या ३०-३५ वर्षांत एकवेळ सुद्धा पाणी उपसा बंद करण्यात आला नाही. इतके मुबलक पाणी वारणा नदीतून मिळते. त्यामुळे इचलकरंजीला पाणी दिल्यास वारणा नदीमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा करण्यात आलेला गैरसमज अत्यंत चुकीचा आहे.

Web Title: Unity Movement for Varna Scheme: The announcement of city President Alka Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.